Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनूतन बुध्दिबळ मंडळा तर्फे आयोजित 55व्या कै.बाबूकाका शिरगांवकर खुल्या एकदिवसीय फिडे रॅपिड...

नूतन बुध्दिबळ मंडळा तर्फे आयोजित 55व्या कै.बाबूकाका शिरगांवकर खुल्या एकदिवसीय फिडे रॅपिड रेटिंग बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

यावर्षी हि स्पर्धा पुणे येथे रंगणार; स्पर्धेत 5 लाख रुपयांची पारितोषिके

पुणे, २ मे २०२४: कै. भाऊसाहेब पडसलगीकर यांनी स्थापन केलेल्या नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे 54 वर्षे यशस्वीपणे आयोजित करत असलेल्या बुद्धिबळ महोत्सवापैकी बाबूकाका शिरगांवकर खुल्या एकदिवसीय फिडे रॅपिड रेटिंग बुध्दिबळ स्पर्धेचे यावर्षी प्रथमच पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना नूतन बुध्दिबळ मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश चितळे, उपाध्यक्ष चिदंबर कोटीभास्कर यांनी सांगितले की, स्पर्धेचे यंदाचे हे 55वे वर्ष आहे. सांगली येथे या स्पर्धेचे याआधी यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येत होते. खेळाडूंच्या दृष्टीने पुण्यात उपलब्ध असलेल्या सोइ-सुविधा यामुळे यंदाच्या वर्षी हि स्पर्धा पुण्यात होत आहे. यावेळी एमसीएचे सचिव निरंजन गोडबोले, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, प्रमोद चौगुले, वूमन्स ग्रँडमास्टर स्वाती घाटे, प्रसाद माने, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे आणि आरबीटर व स्पर्धा समन्वयक जुईली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

यावर्षीची खुल्या गटासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पारितोषिकाची (रू.५लाख) आदरणीय कै.बाबूकाका शिरगांवकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा यावर्षी प्रथमच पुण्यात गुलमोहर हॅाल अभिरूची मॉल, सिंहगड रोड येथे 12 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा एआयसीएफ व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत आहे.

 

 

 

मंडळाचे अध्यक्ष मा. राजाभाऊ शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली 8,10,12,14,16 या वयोगटातील स्पर्धा, तसेच रँपिड् व सांघिक अजिंक्यपद स्पर्धा, महिलांसाठी कै. सौ. मीनाताई शिरगांवकर खुली रॅपिड् बुद्धिबळ स्पर्धा अशा 10 विविध स्पर्धा, याचबरोबर बुध्दिबळ प्रशिक्षण असा हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॅा. बापट बाल शिक्षणमंदिरात दि 20 एप्रिल ते 2 जून पर्यंत चालणार आहे.

 

 

 

स्पर्धेत एकूण 5 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूला करंडक व 60,000/-रुपये, तर उपविजेत्या खेळाडूस करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. शिरगांवकर परिवार (दि.उगार शुगर वक्स लि.) यांच्यावतीने 1400 ते 1550,1551 ते 1700,1701 ते 1850 , 1851 ते 2000रेटिंग असलेल्या व बिगर मानांकित खेळाडूंसाठी करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सांगली जिल्हा खेळाडूसाठी 15 पारितोषिके ,महिला, 60 वर्षावरील गटासाठी,8,10,12, 14,16 वयोगटातील प्रत्येकी 10 मुले व 10 मुली आणि विशेष मुलांसाठीदेखील पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, उप पंच म्हणून अथर्व गोडबोले, दिप्ती शिदोरे,अजिंक्य पिंगळे, गौरव रे, जुईली कुलकर्णी, पौर्णिमा उपळावीकर, शार्दुल तपासे, दिपक वायचळ हे का

म पाहणार आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments