Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिस्सान मोटर्स इंडियाची एप्रिल २०२४ मध्ये ३०४३ गाड्यांची घाऊक विक्री  त्यात...

निस्सान मोटर्स इंडियाची एप्रिल २०२४ मध्ये ३०४३ गाड्यांची घाऊक विक्री  त्यात भारतात २४०४ गाड्या विकल्या तर ६३९ गाड्या निर्यात केल्या 

 

 

गुरुग्राम ०३ मे २०२४- निस्सान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(NMIPL) ने एप्रिल २०२४ मध्ये ३०४३ गाड्यांची घाऊक विक्री केली आहे. त्यात २४०४ गाड्या भारतात तर ६३९ गाड्या निर्यात केल्या आहेत. निस्सान मोटर्सने निस्सान मॅग्नाईट या गाडीचा ३००००+ चा विक्रीचा टप्पा नुकताच गाठला आणि भारताच्या वाहनविक्री क्षेत्रात गेम चेंजर म्हणून आपले स्थान अधिक बळकट केले.

 

निस्सान मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “आम्ही ग्राहकांना कायमच प्रथम प्राधान्य दिले आहे आणि या आर्थिक वर्षाची सुरुवात आमच्यासाठी चांगली झाली आहे. दिल्ली आणि दुर्गापूर भागात आमचे नवीन वितरक तयार झाले आहेत त्यामुळे सर्व प्रदेशातील ग्राहकांना सेवा उपलब्ध करण्याची कटिबद्धता दिसून येते. आमच्या ग्राहकांप्रति आणि वितरकांप्रति किती सजग आहोत हे या आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे बी एसयुव्ही सेगमेंट मध्ये आमचा शेअर वाढवण्यास नक्कीच मदत होईल.

 

डिसेंबर २०२० मध्ये बाजारात आल्यापासून मॅग्नाईटने भारतीय ग्राहकांची मनं जिंकली आणि देशांतर्गत बाजारपेठेत १००००० कार विकल्या गेल्या तर इतर देशात ३०,००० कार विकल्या गेल्या. मॅग्नाईटची रचना जपानमध्ये करण्यात आली असून त्याची निर्मिती भारतात करण्यात आली आहे. त्यामुळे निस्सानचे ‘मेक इन इंडिया- मेक द वर्ल्ड’ हे उत्पादनाचे तत्त्व एकदम सार्थ ठरते.

 

निस्सानने त्यांचे भारतातील बाजारपेठेचा 270 टचपॉइंटपर्यंत विस्तार करण्याचेही जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक शोरुम आणि वर्कशॉप उघडणार आहे. दिल्ली आणि दुर्गापूरमध्ये विक्री आणि सेवा केंद्र कंपनीने उघडले. त्यावरबून उत्कृष्ट सेवा देण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचा निश्चय दिसून येतो. या आर्थिक वर्षात निस्सान त्यांच्या सेवांचा असाच विस्तार करणार असून भारतातील ग्राहकांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतील.

 

 

भव्यदिव्य, आकर्षक, दिसणारी निस्सान मॅग्नाईट १५ देशांमद्ये निर्यात होते. नुकतीच ती सेशल्स, बांग्लादेश, युंगाडा आणि ब्रुनेईमध्ये लाँच झाली. गेल्या काही वर्षांत निस्सान मोटर्सने मध्य पूर्व देश म्हणजे सौदी अरेबिया, युएई, ओमान, कतार, बहरीन आणि कुवैत या देशात निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments