Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेवीलिंक व यशोपुरम सोसायटी – चिंचवड मतदार जनजागृती अभियान

देवीलिंक व यशोपुरम सोसायटी – चिंचवड मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली देवीलिंक व यशोपुरम सोसायटी, चिंचवड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी देवीलिंक सोसायटीचे चेअरमन श्री. गोपाल खत्री, श्री. श्रीराम वाघ, श्री. दिगंबर वाघ,श्री. प्रदिप टाकसाळे, श्री. प्रमोद गुजर व यशोपुरम सोसायटीमधील श्री. जयंत पराळसर, श्री. राहुल खोले, श्री. सुहास जोशी, श्रीम.रोहिणी जोशी, श्रीम.स्वाती जरांगे तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री. राजाराम सरगर व स्वीप टिममधील इतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.

 

यावेळी तेथे उपस्थित असलेले मतदार नागरीक यांना निवडणूकीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये “मतदान तुमचा अधिकार आहे , मतदान करायचे आहे आपले कर्तव्य बजावयाचे आहे.” अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच त्यांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात येवून त्यांच्याकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments