मुंबई, मे, 2024 – अमेझॉन मिनीटीव्ही या अमेझॉनच्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मे महिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय शोज उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. विविध प्रकार आणि कथांचा समावेश असलेले हे शोज त्यांच्या मूळ भाषेसह हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये डब करून मिनीटीव्ही इम्पोर्टेड अंतर्गत उपलब्ध केले जातील. उत्कंठा वाढवणाऱ्या शोजपासून भारावणाऱ्या प्रेमकहाणीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्यात पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक सीरीज प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन आणि नाट्यमय कलाटणीसह खिळवून ठेवतील. हे शोज या महिन्यात उपलब्ध केले जाणार असून त्यात अवर सिक्रेट, यु आर माय डेस्टिनी, ड्रीमिंग ऑफ यू, द वे यू शाइन आणि आय बिलाँद टु युवर वर्ल्ड यांचा समावेश आहे.
खिळवून ठेवणाऱ्या नाट्यापासून रोमँटिक थ्रिलर आणि टाइम ट्रॅव्हलपर्यंत बरंच काही व प्रत्येकाच्या आवडीनुसार उपलब्ध केले जाणार आहे. भावनांचा चढ- उतार असलेला अवर सिक्रेट हा शो प्रेम आणि कॉलेजमधल्या दिवसांवर आधारित आहे, तर यु आर माय डेस्टिनीमध्ये पूर्णपणे वेगळ्या विश्वातील, सर्व आव्हाने, काळ आणि अंतर पार करत एकत्र येणाऱ्या दोन व्यक्तींचा प्रवास दाखवणारा आहे. ड्रीमिंग ऑफ यु या शोमध्ये एक तरुण मुलगा त्याच्या केयर होममधल्या एका रहिवाशाच्या प्रेमात पडतो, तर द वे यु शाइन या शोमध्ये समाजाच्या दबावाविरोधात प्रेम आणि स्वप्नांची क्रांतीकारी ताकद अनुभवता येते. हे नवे शोज प्रेक्षकांना त्यातील गोष्ट व नाट्याने खिळवून ठेवतील. आय बिलाँग्ड टु युवर वर्ल्डची कथा चाहत्यांना जबरदस्त प्रेमकहाणी अनुभवण्याची संधी देते. या शोमधला मुलगा आपल्या आईला तिचा संभाव्य पती शोधण्यास मदत करण्यासाठी भूतकाळात प्रवास करतो.
अमेझॉन मिनीटीव्हीचे कंटेट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘अमेझॉन मिनीटीव्हीमध्ये आम्ही प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वैविध्यपूर्ण कंटेंट उपलब्ध करून देत मनोरंजन करण्यासाठी बांधील आहोत. नव्याने उपलब्ध केले जात असलेले अवर सिक्रेट, ड्रीमिंग ऑफ यु आणि इतर शोज ही बांधिलकी जपणारे आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या भाषेत आणि मोफत या आंतरराष्ट्रीय शोजचा आनंद घेता येईल.’
हे आंतरराष्ट्रीय शोज त्यांच्या मूळ भाषेसह हिंदी, तेलुगु व तमिळ भाषेत केवळ अमेझॉन मिनीटीव्ही इम्पोर्टेड, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्हीवर मोफत पाहाता येतील किंवा प्लेस्टोअरवरून अॅप डाउनलोड करता येती
ल.


