BAFTA ब्रेकथ्रू हा कलाविषयक धर्मादाय संघटनेचा प्रमुख प्रतिभाशोध उपक्रम नेटफ्लिक्सच्या सहयोगाने आयोजित करण्यात येत आहे. उद्योगक्षेत्रातील व्यक्तींच्या भेटीगाठी आणि व्यावसायिक विकासाच्या संधी देणारा वर्षभर चालणारा कार्यक्रम
US, UK आणि भारतीय प्रांतासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज दाखल करण्याची भारतासाठीची अंतिम तारीख २ जुलै २०२४
इच्छुकांनी नावनोंदणीसाठी www.bafta.org/supporting-talent/breakthrough येथे भेट द्यावी
भारत, मे २०२४: पडद्यावरील कलेसाठीची UK मधील अग्रगण्य चॅरिटी संघटना BAFTA नेटफ्लिक्सच्या सहयोगाने भारतामध्ये आपल्या ब्रेकथ्रू प्रोग्रामचे चौथे पर्व घेऊन आली आहे. BAFTA ब्रेकथ्रू इंडिया फिल्म्स, गेम्स आणि टेलिव्हिजन उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत नव्या पिढीच्या प्रतिभावंत व्यावसायिकांचे कसब ओळखून त्यांचा गौरव करणारा मंच आहे. यावर्षी दुसऱ्यांदा BAFTA ब्रेकथ्रू प्रोग्रामने भारत, US आणि UK प्रांतांसाठी एकाचवेळी आपली अर्जनोंदणी खुली केली आहे.
BAFTA ने आपल्या मार्गदर्शन आणि प्रतिभाशोध कार्यक्रमाच्या माध्यमातून कितीतरी सर्जनशील व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रामधील अडथळ्यांवर मात करण्यास मदत करणाऱ्या, त्यांच्या कौशल्यांना अधिक निपुण बनविणाऱ्या आणि त्यांच्या कारकिर्दीला चालना मिळावी अशाप्रकारे त्यांना सहकार्य पुरविणाऱ्या एका सर्वसमावेशी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपापल्या कौशल्याचा पाठपुरावा करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
ही संधी मिळविणाऱ्या ‘ब्रेकथ्रूज’ना या उद्योगक्षेत्रातील धुरिणांबरोबर होणाऱ्या एकास-एक संवादामध्ये तसेच गटचर्चांमध्ये सहभागी होतील. आपले व्यावसायिक आणि निर्मिती कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. BAFTA सदस्यत्वाच्या माध्यमातून आपल्या उद्योगक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या जगभरातील व्यक्तींबरोबर संपर्कजाळे बनविण्याच्या संधीबरोबरच या प्रोग्रामच्या कालावधीमध्ये होणाऱ्या म्हणजेच १२ महिन्यांमध्ये BAFTA च्या सर्व प्रशिक्षण, विकास आणि नेटवर्किंग उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचीही संधी विजेत्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जनसंपर्काचे पाठबळ लाभलेली सादरीकरणाची PR backed showcase संधीही या ब्रेकथ्रूजना मिळणार आहे.
BAFTA चे लर्निंग, इन्क्लुजन, पॉलिसी अँड मेंबरशिपसाठीचे एक्झेक्युटिव्ह डिरेक्टर टिम हंटर म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की, BAFTA ब्रेकथ्रू इंडियासाठीची अर्जनोंदणी पुन्हा एकदा खुली झाली आहे. नेटफ्लिक्सकडून मिळालेल्या उदार पाठिंब्यामुळे या उपक्रमातून भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम्स उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या असाधारण प्रतिभावंतांच्या एका अख्ख्या फळीची जडणघडण होताना दिसणार आहे आणि या मंडळींनी या वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होत असलेल्या आमच्या वैश्विक सदस्यत्वधारकांसमोर आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.”
नेटफ्लिक्स इंडियाच्या व्हाइस प्रेसिडंट ऑफ कन्टेन्ट मोनिका शेरगिल म्हणाल्या, “BAFTA ब्रेकथ्रू इंडिया प्रोग्राम हा उदयोन्मुख सर्जनशील अविष्कारांना बळ देण्याच्या आणि त्यांना जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करण्याच्या नेटफ्लिक्सच्या ध्येयधोरणाशी अचूक मेळ साधणारा आहे. या उपक्रमातून गेल्या चार वर्षांमध्ये हाती लागलेल्या अभिजात गुणवत्तेमधील वैविध्य हे या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड यशाचे द्योतक आहे. BAFTA बरोबरचा हा सहयोग पुढे सुरू ठेवण्यास आणि भारतातील सर्जनशील अभिव्यक्तीच्या नव्या पिढीचा शोध घेऊन तिची जोपासना करण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत.”
सिख्या एंटरटेन्मेंटचे संस्थापक आणि सीईओ, फिल्म निर्माता आणि ब्रेकथ्रू इंडियाचे अॅम्बेसेडर गुनीत मोंगा कपूर म्हणाले, “भारतामध्ये सर्जनशील प्रतिभावंतांची विपुलता आहे हे ब्रेकथ्रूच्या याआधीच्या तीन पर्वांमधून सिद्ध झाले आहे. मी एका अशा काळात लहानाचा मोठा झालो जेव्हा अशाप्रकारच्या संधी मिळण्याची कल्पनाही करणे शक्य नव्हते. भारतातील चित्रपट, टेलिव्हिजन आणि गेम्सच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सर्जनशील कलावंतांच्या नव्या पिढीने या वर्षीच्या कार्यक्रमासाठी अर्ज करावा यासाठी मी त्यांना आवर्जून प्रोत्साहित करू इच्छितो. BAFTA ब्रेकथ्रू आपल्या उद्योगक्षेत्रातील तरुण चेंजमेकर्सना अनमोल अशी संसाधने देऊ करते आणि यंदाच्या वर्षी या कार्यक्रमात सहभागी होणारे आपल्या कौशल्यांना परजण्यासाठी आणि भारतीय स्क्रीन इंडस्ट्रीजना एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेऊन जाण्यासाठी या संधींचा वापर करून घेत असताना त्याचे साक्षीदार बनण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”
सलग सहाव्या वर्षी BAFTA ब्रेकथ्रूचे प्रमुख सहकारी असलेले नेटफ्लिक्स या उपक्रमाच्या जगभरातील विस्तारासाठी एकात्मतेने पाठबळ पुरवित राहणार आहे. ब्रेकथ्रूच्या माध्यमातून, BAFTA आणि नेटफ्लिक्स जगभरातील उदयोन्मुख प्रतिभेचा गौरव करणे आणि या प्रतिभेला संधी पुरविणे, विविध संस्कृतींमधील कहाण्या आणि अभिव्यक्तींना विकसित करण्यासाठी, त्यांना पाठबळ पुरविण्यासाठी जागतिक नेटवर्कचा भाग असलेल्या आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे हे BAFTA व नेटफ्लिक्सचे सामायिक ध्येय आहे.
BAFTA ब्रेकथ्रू २०२३ मध्ये अनेक होतकरू प्रतिभावंत सहभागी झाले. यात २०१६ साली ‘अॅन इनसिग्निफिकन्ट मॅन’साठी एडिटर, पोस्ट प्रोड्युसर आणि चीफ असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करणाऱ्या अभिनव त्यागीच समावेश होता. अभिनेता म्हणून सक्रीय असलेला शार्दूल भारद्वाजही या तुकडीचा आणखी एक सदस्य होता. २०१९ साली प्रसिद्ध झालेल्या आणि समीक्षकांकडून गौरवल्या गेलेल्या ‘ईब अल्ले ऊ!’ या फिल्ममध्ये त्याने भूमिका केली होती तसेच ‘सोनी’ या २०१८ सालच्या नेटफ्लिक्सवरी फिल्मसाठी असिस्टंट डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम पाहिले होते.
BAFTA ब्रेकथ्रूने आपल्या आधीच्या वर्षांतील सहगणांसाठी जगभरातील दारे खुली केली, त्यांना त्यांच्या संबंधित उद्योगक्षेत्रातील सर्वात मान्यवर आणि प्रभावशाली लोकांपैकी काहींच्यासोबत कामाची संधी मिळवून देण्यास मदत केली. या प्रसिद्ध व्यक्तींजवळील कौशल्य, ज्ञान व अनुभव यातून काही शिकण्याची व एका नव्या दृष्टीकोनातून आपले करिअर पुढे घेऊन जाण्याची संधी दिली.
अभिनेत्री तान्या मानिकतला ब्रेकथ्रूजच्या भारतातील कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षातील सहभागींपैकी एक होती. मीरा नायर यांनी नेटफ्लिक्ससाठी बनविलेल्या विक्रम सेठ यांच्या ‘ए सुटेबल बॉय’ या कादंबरीच्या चित्रावृत्तीमध्ये तिने भूमिका केली. तान्या मानिकतलाने आपला अनुभव कथन करताना सांगितले, “BAFTA ब्रेकथ्रूशी जोडले जाणे हा एक विलक्षण अनभव होता. तुमच्याकडून मिळालेल्या सर्व मार्गदर्शनासाठी आणि प्रोत्साहनासाठी मी खूप आभारी आहे.”
संगीतकार आणि दिग्दर्शक अलोकनंदा दासगुप्ता २०२२ च्या तुकडीचा भाग होती. तिला दिग्दर्शक रिचा मेहता आणि असिफ कपाडिया यांच्याबरोबर अभिनेत्री, कॉमेडियन आणि निर्माती फीबी वॉलर-ब्रिजबरोबर संवाद साधण्याचे सुदैव लाभले. कॉमेडियन सुमुखी सुरेशलाही ब्रेकथ्रू प्रोग्रामच्या माध्यमातून अभिनेत्री रत्ना पाठक आणि BBC कॉमेडी कमिशनर एमा लॉसन यांच्यासारख्या उद्योगक्षेत्रातील जुन्याजाणत्या मंडळींना भेटण्याची संधी मिळाली.
BAFTA ने सर्वोत्कृष्टतेप्रती जपलेली बांधिलकी या मंचाच्या निवडप्रक्रियेमध्येही प्रतिबिंबित झाली आहे. आपल्या विविधतापूर्ण अनुभवसंपन्नतेच्या आणि आणि कुशलता सिद्ध करणाऱ्या पूर्वकामगिरीच्या आधारे अत्यंत चिकित्सापूर्वक निवडण्यात आलेल्या उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे मान्यवर परीक्षकमंडळ BAFTA ब्रेकथ्रू इंडियासाठी आलेल्या अर्जांचे मूल्यमापन करणार आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या क्षमतांचे सर्व बाजूंनी आणि सखोर विचारांती मूल्यमापन होईल, याची काळजी घेतली जाणार आहे.
BAFTA ब्रेकथ्रू २०२४ ची सांगता या वर्षाच्या उत्तरार्धात होईल आणि भारत, US व UK प्रांतातील ब्रेकथ्रूज/अंतिम सूचीसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांची नावे वैश्विक घोषणेद्वारे एकाचवेळी जाहीर करण्यात येतील.
अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी:
BAFTA पुढील पात्रतेमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचा शोध घेत आहे:
अर्जाच्या वेळी उमेदवाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे
भारताचे प्राथमिक नागरिकत्व
इंग्रजीमधून संवाद साधण्यावर प्रभूत्व
भारतीय फिल्म, गेम्स किंवा टेलिव्हिजन उद्योगक्षेत्राअंतर्गत अॅनिमेटर, कोरिओग्राफर**, सिनेमॅटोग्राफर, कलरिस्ट, कम्पोझर, कॉस्च्युम डिझायनर, डिरेक्टर, एडिटर, गेम डेव्हलपर, गेम डिरेक्टर, गेम प्रोड्युसर, हेअर/मेक-अप आर्टिस्ट, परफॉर्मर, प्रेझेंटर, प्रोड्युसर/डिरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर, सीरिज डिरेक्टर, सीरिज प्रोड्युसर, साउंड एडिटर/मिक्सर, रायटर किंवा VFX/3D आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती
**BAFTA च्या सदस्यत्वाकडून कोरिओग्राफर्सचे सुस्पष्टपणे प्रतिनिधीत्व केले जात नसले तरीही अर्जदार ब्रेकथ्रू प्रोग्रामसाठी अर्ज करू शकतात, निवड झाल्यास त्यांना आपले ज्ञान विकसित करण्याच्या आणि फिल्म, गेम्स व टेलिव्हिजन क्षेत्राच्या BAFTA सदस्यत्व आणि नेटवर्कमध्ये उल्लेखलेल्या इतर विभागांशी आणि क्रिएटिव्जबरोबर जोडले जाण्यासी संधी मिळेल.
याखेरीज त्यांना:
संबंधित प्रांतीय फिल्म, गेम्स किंवा टेलिव्हिजन उद्योग संघटनेकडून एक शिफारस पत्र मिळेल.
पुढील अटींत बसणाऱ्या एका कलाकृतीसाठी एका अग्रगण्य व्यावसायिकाकडून नामनिर्देश:
१ जून २०२३ आणि १ सप्टेंबर २०२४ दरम्यान भारतात प्रेक्षागृहात दाखविली गेलेली (किंवा अर्ज करण्याच्या वेळेच्या आसपास प्रसिद्ध होऊ घातलेली) कलाकृती
किंवा १ जून २०२३ आणि १ सप्टेंबर २०२४ या दरम्यान टेलिव्हिजनवर वा ओटीटी मंचावर प्रसारित झालेली (किंवा अर्ज करण्याच्या वेळेच्या आसपास प्रसिद्ध होऊ घातलेली) कलाकृती
किंवा गेम्ससाठी १ जून २०२३ आणि १ सप्टेंबर २०२४ दरम्यान भारतात एका सार्वजनिकरित्या उपलब्ध मंचावर प्रसिद्ध झालेला (किंवा अर्ज करण्याच्या वेळेच्या आसपास प्रसिद्ध होऊ घातलेला) गेम
UK मध्ये संबंधित क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींशी सहयोग साधण्याची आणि आपल्याकडील कौशल्याचे आदानप्रदान करण्याची आणि/किंवा UK मधील प्रेक्षकांसाठी कन्टेन्ट निर्मिती करण्याची उघडपणे दिसणारी महत्त्वाकांक्षा
BAFTA ब्रेकथ्रू इंडिया २०२४ साठीचे अर्ज ७ मे २०२४ पासून स्वीकारले जाणार आहेत. हा कार्यक्रम, पात्रतेचे निकष, अर्ज कसा करावा याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया येथे https://www.bafta.org/supporting-talent/breakthrough/bafta-breakthrough-india भेट द्या.
संपादकांसाठी नोंदी:
BAFTA ब्रेकथ्रूविषयी अधिक माहिती
देशातील फिल्म, गेम्स आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील उदयोन्मुख सर्जनशील प्रतिभावंतांच्या नव्या पिढीचा शोध घेत तिची जोपासना करण्याच्या हेतूने वर्ष २०२० मध्ये BAFTA चा भारतात विस्तार झाला.
भारतातील पदार्पणापासून या प्रोग्रामने आपल्या याआधीच्या तीन तुकड्यांमधून ३० भारतीयांच्या कारकिर्दीला पाठबळ दिले आहे:
BAFTA इंडिया ब्रेकथूच्या पहिल्या तुकडीतील ‘ब्रेकथ्रूज’मध्ये अक्षय सिंग, अरुण कार्थिक, जय पिनाक ओझा, कार्तिकेय मूर्ती, पालोमी घोष, रेणू सावंत, श्रुती घोष, सुमित पुरोहित, तान्या मानिकताला आणि विक्रम सिंग यांचा समावेश होता.
त्यापुढील वर्षाच्या ‘ब्रेकथ्रूज’च्या गटामध्ये अजितपाल सिंग, अलोकनंदा दासगुप्ता, आरती कडव, लीना मणिमेकलाइ, माथिवनन राजेंद्रन, नकुल वर्मा, प्रतीक वत्स, सौम्यानंदा साही, शुभम आणि सुमुखी सुरेश यांचा समावेश होता.
२०२३च्या भारतातील ‘ब्रेकथ्रूज’च्या गटात अभय कोरान्ने, अभिनव त्यागी, डॉन टाको पलाथ्रा, लिपिका सिंग दाराई, मिरियम चंदी मेनाचेरी, पूजा राजकुमार राठोड, सनल जॉर्ज, सत्या राय नागपॉल, शार्दुल भारद्वाज यांचा समावेश होता.
यशस्वी अर्जदार पुढील गोष्टींबरोबरच आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगच्या संधींना पाठबळ देण्यासाठी एका शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील:
उद्योगक्षेत्रातील व्यक्तींशी एकास एक संवाद आणि गटचर्चा सत्र
BAFTA चे एका वर्षाचे संपूर्ण सदस्यत्व आणि त्याची कालमर्यादा वाढविण्याचा पर्याय
करिअर कोचिंग सत्रांना हजर राहण्याची संधी आणि व्यावसायिक कौशल्यविकासाद्वारे मदत
भारतातील BAFTA ब्रेकथ्रूविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी www.bafta.org/supporting-talent/breakthrough
/bafta-breakthrough-india येथे भेट द्या.


