Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजपने मातंग समाजाच्या पाठींब्याबाबत खोटे वृत्त पसरवले ट्रस्टच्या नावाचा गैरवापर केला.

भाजपने मातंग समाजाच्या पाठींब्याबाबत खोटे वृत्त पसरवले ट्रस्टच्या नावाचा गैरवापर केला.

 

पुण्यातील क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्ट तर्फे मातंग समाजाने भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा दिल्याचे पत्रक भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रकाशित केले आहे. पाठींब्याबाबतचे पत्रक पूर्णतः खोटे असून क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्टने कोणत्याही प्रकारचा पाठींबा भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना दिलेला नाही. असे ट्रस्टचे सचिव विकास लक्ष्मण सातारकर तसेच उपाध्यक्ष रवीभाऊ आरडे आणि खजिनदार अशोकभाऊ जगताप यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

 

मातंग सामाज्याची मते भाजपला मिळवीत यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र असून मातंग समाजाने याची वेळीस दाखल घ्यावी असे त्यांनी पुढे सांगितले.

 

क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची समाधी पुण्यातील संगम वाडी येथे समाज बांधवांनी शोधून काढल्यानंतर शासकीय प्रक्रिया सुरु होऊन सन २०२१ – २२ या कालावधीत ही संपूर्ण जागा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने कायदेशीर रित्या ताब्यात घेऊन पुणे महानगर पालिकेकडे सुपूर्त केली. तसेच या जागेवर राष्ट्रीय स्मारकाचे आरक्षण टाकले. या जागेच्या भूसंपादनासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने ८७.११ कोटी रुपये निधी मंजूर केला होता.

 

 

क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्ट मातंग समाजातील सुमारे २५ सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केला असून सर्व पक्षीय समाज नेते यामध्ये पदाधिकारी आहेत. पुणे लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा देण्याबाबतचा कोणताही ठराव ट्रस्टच्या पदाधिकार्यांमध्ये झालेला नाही तरीही खोडसाळपणे खोटी माहिती पसरवत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना ट्रस्टने म्हणजेच मातंग समाजाने पाठींबा दिला असल्याचे भासवत विशाल मातंग समाजाची देखील फसवणूक केली आहे. तसेच ही जागा समाजाला मिळण्यास सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले हा पत्रकात करण्यात आलेला दावाही संपूर्णपणे खोटा आहे हे वरील निवेदनावरून दिसून येईल.

 

या संदर्भात क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्टतर्फे ट्रस्टचे पदाधिकारी व समाजातील विविध मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी श्री. सुहास दिवसे यांच्याकडे आक्षेप घेणारा तक्रार अर्ज दाखल केला असून, फसवणूक केल्या संदर्भात बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येत असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मातंग समाजाने भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेल्या खोट्या माहितीवर विश्वास ठेऊ नये उलट समाजाची फसवणूक केल्याबद्दल त्यांचा निषेध करावा असे आवाहन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments