Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती पुण्यात उत्साहात साजरी*🚩

जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती पुण्यात उत्साहात साजरी*🚩

 

*अक्षय तृतीयाला जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती ( दि . १० मे ) उत्साहात साजरी केली गेली*.

*वीरशैव मतप्रणालीच्या आद्य पंचाचार्यांपैकी जगदगुरु एकोरामाराध्य व जगदगुरु मरुळाराध्य यांच्या प्रकट दिनांच्या औचित्याची झालर सुद्धा या उत्सवाला होती* .

*हिंदू वीरशैव लिंगायत मंच या वीरशैव लिंगायत समाजात कार्य करणाऱ्या राज्यातील संघटनेच्या पुणे शाखेच्या वतीने हा सोहळा म . बसवेश्वर पुतळा , बाजीराव रोड पुणे येथे साजरा करण्यात आला* .

*यावेळी म .बसवेश्वर यांच्या पुतळ्याला सुप्रसिध्द उद्योजक श्री रवीजी कल्याणे ( नांदेड सिटी ) यांच्या हस्ते पुतळ्याचा हार अर्पण करण्यात आला , त्यांच्या बरोबर नांदेड सिटी ,पुणे चे जेष्ठ संचालक श्री नरसिंह लगड , जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश गोरे , श्री हेमंतजी रासने गोरक्षक हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री मिलिंद एकबोटे , सुप्रसिद्ध लेखिका डॉ. श्यामाताई घोणसे ‘ विश्वेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष श्री सुनिल रुकारी , खेडशिवापूरचे श्री वनपत्रे , वडगाशेरीतील वीरशैव सेवा मंडळाचे श्री संतोष यादवडे , वीर माहेश्वर मंडळाचे श्री महेश कुगावकर , श्री पराग स्वामी , श्री मिलींद वालवडकर , माजी उपराष्ट्रपती बी .डी. जत्ती यांचे नातू अशोक सोरगावी , गवळी समाजाचे किशोर कडेकर , अशोक म्हंकाळे रा स्व संघाचे श्री राजाभाऊ पानगावे , जिलब्या मारुती मंडळाचे रवि रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते* .

*पुष्पहार समर्पणानंतर अयोध्येच्या रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या दिवशी ज्यांनी शंख नाद मानवंदना दिली होती त्याच केशव पथकाने म. बसवेश्वरांना शंखनाद मानवंदना दिली* .

*डॉ. श्यामाताई घोणसे लिखित ” क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर ” या पुस्तकाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले . महात्मा बसवेश्वर महाराजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजातील अनेकांनी सहकुटूंब , सहपरिवार आपली उपस्थिती लावली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमर जंगम यांनी केले. हिंदु वीरशैव लिंगायत मंचाच्या अधिवक्ता आघाडीचे प्रमुखॲड. वैजनाथ विंचूरकर व पुणे महानगर संयोजक श्री अतुल सरडे यांच्या संयोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ओ.बी .सी. आघाडीचे दिनेश नायकू , अशोक स्वामी , सागर निंबाळकर , आशिश हिंगमिरे , जयेश कस्तुरे , विजय कस्तुरे , अविनाश कुलकर्णी , पुंडलीक मेथे , ॲड .सचिन मारटकर , अमोल म्हंकाळे,श्री राहुल विभुते , श्री राजेश मनगिरे , शिवा पत्रे , सौ. शिल्पा निंबाळकर , सौ. फिरमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते*.

*महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रमुख सयोजक श्री शरद गंजीवाले यांनी सर्वांचे स्वागत केले*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments