मातृदिन जवळ आला आहे आणि तुमच्या जन्मदात्री आईप्रती प्रेम व कौतुक व्यक्त करण्याची ही परिपूर्ण संधी आहे. पुष्पगुच्छ व चॉकलेट्स हे क्लासिक पर्याय असले तरी यंदा काहीशा वेगळ्या गिफ्टसह आईला सरप्राइज केले तर? बाहेर फेरफटका मारायला आवडणाऱ्या किंवा दैनंदिन परिवहनासाठी सोईस्कर साधनाची गरज असलेल्या सक्रिय, पर्यावरणाप्रती जागरूक आईसाठी इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम गिफ्ट ठरू शकते. इलेक्ट्रिक स्कूटर्स पर्यावरणास अनकूल असण्यासोबत किफायतशीर व ऑपरेट करण्यास सुलभ आहेत, ज्यामुळे त्या सर्व वयोगटातील मातांसाठी व्यावहारिक व विचारशील गिफ्ट आहेत. या लेखामध्ये आम्ही यंदा मातृदिनानिमित्त तुमच्या आईला भेट देता येतील अशा सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर्सबाबत चर्चा करत आहोत.
हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स
किंमत – ६२,१९० रूपये
ऑप्टिमा सीएक्समध्ये ५५० वॅट बीएलडीसी मोटर आहे, जी १.२ बीएचपीची सर्वोच्च शक्ती देते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ५२.२ व्होल्ट, ३० एएच लिथियम फॉस्फेट बॅटरी आहे, जी ४ ते ५ तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते. कंपनीने सिंगल व डबल बॅटरी व्हेरिएण्ट्समध्ये स्कूटर सादर केली आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ६२,१९० रूपये व ७७,४९० रूपये आहे. डबल बॅटरी असलेले व्हेरिएण्ट एका चार्जमध्ये १४० किमीची रेंज देते आणि प्रतितास ४५ किमीची अव्वल गती प्राप्त करू शकते.
ओडीसी रेसर लाइट व्ही२
किंमत – ७७,२५० रूपये
इलेक्ट्रिक स्कूटर व्ही२ मध्ये शक्तिशाली व वॉटरप्रूफ मोटर आहे आणि या स्कूटरमधील ड्युअल बॅटरी सिस्टमसह तुम्ही पॉवर कमी होण्याची चिंता न करता लांबच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. लिथियम-आयन बॅटरी तीन ते चार तासांमध्ये संपूर्ण चार्ज होण्याची खात्री देते आणि ७५ किमीची रेंज देते. या स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स आणि मोठे बूट स्पेस आहे, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे व सुलभपणे तुमचे सामान स्टोअर करू शकता. याव्यतिरिक्त अॅण्टी-थेफ्ट लॉक स्कूटर वापरात नसताना सुरक्षित असण्याची खात्री देते. इलेक्ट्रिक स्कूटर व्ही२ आरामदायी व विश्वसनीय राइड देते. रॅडियण्ट रेड, पेस्टल पीच, सफायर ब्ल्यू, पिस्ता, पर्ल व्हाइट व कोर्बान ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध ही स्कूटर निश्चितच रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
प्युअर ईव्ही ईप्लूटो
किंमत – ९२,९९९ रूपये
प्युअर ईव्ही ईप्लूटो कार्यक्षमता व शाश्वततेवर भर देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये २.५ केडब्ल्यू बीएलडीसी मोटर आहे, ज्यामधून प्रतितास ६० किमीच्या अव्वल गतीमध्ये सुलभ व कार्यक्षम राइडची खात्री मिळते. रिमूव्हेबल लिथियम-आयन बॅटरी जवळपास ८० किमीपर्यंतची प्रभावी रेंज देते. उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि अलॉई व्हील्स. विश्वसनीयता आणि पर्यावरणास अनुकूल डिझाइनवर लक्ष केंद्रित करत प्युअर ईव्ही ईप्लूटो लक्षवेधक निवड आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत स्पर्धात्मक आहे, ज्यामुळे ही स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर बाजारपेठेमध्ये आकर्षक पर्याय आहे.
ओकिनावा रिज १००
किंमत: १,१५,३११ रूपये
ओकिनावा रिज १०० एक व्हेरिएण्ट आणि तीन रंगांमध्ये येते. या स्कूटरमध्ये शक्तिशाली ८०० वॅट मोटर व इलेक्ट्रॉनिकली असिस्टेड ब्रेकिंग सिस्टमसह फ्रण्ट आणि रिअर ड्रम ब्रेक्स आहेत. आकर्षक डिझाइन, व्यावहारिक वैशिष्ट्ये आणि १४९ किमीच्या रेंजसह रिज १०० मध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जसे सेंट्रल लॉकिंग, अॅण्टी-थेफ्ट सिस्टम, जिओ-फेन्सिंग, इम्मोबिलायझेशन, पार्किंग असिस्टण्स, ट्रॅकिंग व मॉनिटरिंग. ही स्कूटर जवळपास पाच ते सहा तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते आणि अव्वल गती प्रतितास ५० किमी आहे.
ओला एस१
किंमत – १,२९,९९९ रूपये
ओला एस१ आणि ओला एस१ प्रो या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये आकर्षक डिझाइनसह अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. ट्विन-पॉड हेडलाइट्स, एैसपैस स्टोरेज आणि प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्यांसह रिमोट लॉक/अनलॉक व डिस्क ब्रेक्स असलेली ओला एस१ सिरीज स्टाइल व कार्यक्षमतेची खात्री देते. तसेच, विविध बॅटरी पर्यायांसह नवीन अपडेट्स आणि क्रूझ कंट्रोल व वॉईस असिस्ट यांसारख्या अतिरिक्त वैशिष्ट्यांनी युक्त ही सिरीज उत्तम गिफ्ट आहे.
यंदा मातृदिनानिमितम्त या टॉप इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एका स्कूटरसह तुमच्या आईला स्वातंत्र्य व गतीशीलतेचे गिफ्ट द्या. शहरामध्ये राइडिंगचा आनंद घ्यायचा असो किंवा नवीन साहसी राइडिंगवर जायचे असो ती या इलेक्ट्रिक स्कूटर्स प्रदान करणाऱ्या सोयीसु
विधा, स्टाइल व शाश्वततेचे कौतुक करेल.


