Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसकाळी लवकर मतदान करा अन् चहाला ग्राहकपेठेत या.. ग्राहक पेठ व...

सकाळी लवकर मतदान करा अन् चहाला ग्राहकपेठेत या.. ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीतर्फे सकाळी लवकर मतदान करणाऱ्यांना मोफत चहापान

पुणे : लोकसभेची यंदाची निवडणूक ही देशाची भविष्यातील दिशा ठरवणारी असल्याने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सोमवारी १३ मे रोजी ‘सकाळी लवकर मतदान करा अन चहाला ग्राहकपेठेत या’ असे आवाहन ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केले आहे.

 

ग्राहकपेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जागृतीसाठी गेले काही दिवस प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात सोमवारी दिनांक १३ मे यादिवशी मतदान होणार आहे. या दिवशी सकाळी मतदान करून आलेल्या मतदारांना अर्थातच त्यांच्या बोटाची शाई बघून ग्राहक पेठेच्या कट्ट्यावर ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीच्या वतीने चहा व क्रिमरोल देण्यात येणार आहे.

 

मतदानाच्या दिवशी सकाळी ७.३० वाजल्यापासून ते १०.३० वाजेपर्यंत हा ग्राहकपेठेचा उपक्रम सुरू रहाणार आहे. मतदारांनी सकाळी लवकर मतदान करून ग्राहकपेठेच्या कट्य्यावर चहासाठी यावे असे आवाहन सूर्यकांत पाठक यांनी केले आहे.

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments