Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedवॅल्वोलिन कमिन्स तर्फे 'हॅपीनेस ट्रक 5.0' मोहीम सुरू

वॅल्वोलिन कमिन्स तर्फे ‘हॅपीनेस ट्रक 5.0’ मोहीम सुरू

पुणे,१६ मे २०२४ : इंजिन ऑईल व जागतिक पातळीवर आघाडीचे ल्युब्रिकंट उत्पादक असलेल्या वॅल्वोलिन कमिन्स प्रा.लि.ने मोटर इंडियाच्या सहकार्याने हॅपीनेस ट्रक मोहीमेची नवीन आवृत्ती सुरु केली आहे. मेकॅनिक्स आणि सेवा प्रदात्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही मोहीम येत्या २५ दिवसांत देशातील 20 प्रमुख स्थानांवरून जाणार आहे.या मोहिमेचा मुख्य उद्देश मेकॅनिक्स, फ्लीट मालक आणि इतर सेवा प्रदात्यांना नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी व सक्षम करण्यासाठी त्यांच्याशी जोडणे हा आहे. त्यासाठी प्रत्येक थांब्यावर शैक्षणिक सत्रे आणि संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या प्रवासामध्ये, हॅपीनेस ट्रक मोहिमेअंतर्गत गुवाहाटी, अलपुरद्वार, बिरपारा आणि धुपगुडी, चंगरबंध, सिलीगुडी, दरभंगा आणि मुझफ्फरपूर, गोरखपूर, फैजाबाद, लखनौ, कानपूर, आग्रा, जयपूर, नशिराबाद, भिलवाडा, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, मुंबई, सुरत अशा देशभरातील 20 ठिकाणांचा समावेश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments