पुणे, 28 मे २०२४ : इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च तर्फे बॅचलर ऑफ कॉमर्स इन ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट (बी.कॉम एचसीएम) आणि बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (बी.कॉम बीएफएसआय) हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट आणि बीएफएसआय या दोन्ही गोष्टी आजच्या काळात संपूर्ण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण असून हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे तयार करण्यात आला आहे. यामध्ये उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) अंतर्गत पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम 12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे. इंडसर्चच्या लॉ कॉलेज रोड कॅम्पसमध्ये सुरू होणाऱ्या २०२४-२५ बॅचसाठी प्रवेश खुले आहेत.अधिक माहितीसाठी 020-25431972, 25441524, 7498243241 या क्रमांकावर संपर्क करा.
इंडसर्च तर्फे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु
RELATED ARTICLES


