Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedACINUS 2024" वार्षिक परिषद उत्साहात संपन्न

ACINUS 2024″ वार्षिक परिषद उत्साहात संपन्न

पुणे, 30 मे २०२४: डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातर्फे पिंपरी, पुणे यांनी इंडियन चेस्ट सोसायटीच्या वतीने व श्वसन विकार विभागाच्या सहकार्याने अॅसिनस २०२४ या (ACINUS 2024) वार्षिक परिषदेचे आयोजन केले होते.

ही परिषद दि २३ मे ते २५ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती या तीन दिवसीय परिषदेत श्वसन संदर्भातील विविध वैद्यकीय सत्राचे आयोजन करण्यात आले यात क्षयरोग, फुफ्फुस प्रत्यारोपण, श्वसन विकारासंदभातील संसर्ग, अति गंभीर रुग्णाची काळजी आदी विविध विषयांवर देशातील प्रतिष्ठित महाविद्यालये आणि संस्थांमधील प्रख्यात वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यंदाच्या या परिषदेची मुख्य संकल्पना ‘तज्ञांचा मास्टरक्लास’ही होती. यात प्रख्यात शिक्षणतज्ज्ञांनी भाग घेतला होता.

या परिषदेचे प्रमुख पाहुणे फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट पद्मभूषण डॉ. फारोख ई. उडवाडिया म्हणाले, ही परिषद म्हणजे ” सर्वांचे डोळे उघडणारा अनुभव आहे. नामांकित तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन रुग्णाची काळजी घेण्याच्या क्षेत्रातील प्रगतीचा मार्ग मोकळा करणारे आहे. ते पुढे म्हणाले, “या परिषदेला पाठबळ देण्यासाठी वैद्यकीय संस्थेची बांधिलकी अतिशय प्रेरणादायी आहे. अशा प्रकारच्या परिषदेतून सर्व समावेश ज्ञानाचे आदान प्रदान होत असून यातूनच रुग्णाचे हित साध्य करण्यास मदत होत आहे”

डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार यांनी यावेळी शैक्षणिक-उद्योग भागीदारीचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, ” अशा प्रकारे होणारे सहयोग आणि विचारांची देवाणघेवाण रुग्णांची काळजी घेण्याबरोबर आगामीच्या वैद्यकीय संशोधनातील प्रगती ही या क्षेत्राला आणखी प्रगतीपथावर नेईल. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राने पुन्हा एकदा उत्कृष्टतेप्रति आपली वचनबद्धता दर्शविली आहे. पुढील वर्षी पुन्हा याच उत्साहाने आणि उत्कटतेने कार्यक्रम आयोजित करण्यास उत्सुक आहोत.

डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे.एस. भवाळकर यांनी परिषदांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ अॅसिनस २०२४ चे आयोजन करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ज्ञान संवर्धनची एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली. आरोग्य सेवेकरिता नवीन संशोधन, प्रगती आणि अनुभवी तज्ज्ञ, संशोधक आणि डॉक्टर यांना एकत्र येण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे.

श्वसन विकार विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. एम.एस. बरथवाल यांनी अशा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन हे सर्वांच्या सहकार्याचे फळ आहे असे उदगार त्यानी काढले ते पुढे म्हणाले, या परिषदेमध्ये विशेषतः अभ्यास व संशोधनावावर लक्ष केंद्र करणाऱ्या दिग्गज तज्ज्ञांना आमंत्रित करून त्यांचे कौशल्य व ज्ञानाचे विचारमंथन हे आजच्या तज्ज्ञांना मार्गदर्शनपर ठरले आहे या माध्यमातून आम्ही प्रभावी पद्धतीने सर्वसमावेशक वैद्यकीय ज्ञान देण्याचे ध्येय आज साध्य झाले आहे.”

या परिषदेला डॉ. एस के जिंदाल, माजी प्राध्यापक आणि श्वसन विकार विभाग पीजीआय चंदीगड, डॉ रविंदर सरनाईक, पीजीआय चंदीगडचे माजी विद्यार्थी आणि इंडियन चेस्ट सोसायटीचे अध्यक्ष यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणेचे कुलपती डॉ पी डी पाटील, प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. (ब्रिगेडियर) अमरजित सिंग, शैक्षणिक विभागाच्या संचालक डॉ. पी. वत्सलास्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

“ACINUS 2024” वार्षिक परिषदेच्या माध्यमातून उदयोन्मुख तंत्रज्ञान, श्वसनाच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार, क्रिटिकल केअर आणि झोपेच्या औषधांमधील प्रगती यावर लक्ष केंद्रित करण्याचा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता. या परिषदेमध्ये तीनही दिवस आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषेचेही आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments