Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशातील पहिले दिव्यांग् मंत्रालय महाराष्ट्रात : प्रविण पुरी दिव्यांग व्यक्तींच्या यशस्वी कथा...

देशातील पहिले दिव्यांग् मंत्रालय महाराष्ट्रात : प्रविण पुरी दिव्यांग व्यक्तींच्या यशस्वी कथा देशभर पोहोचवा : हिरेमठ सक्षमच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप

पुणे : देशात २०१६ मध्ये दिव्यांगांसाठी कायदा येण्यापूर्वी पुण्यातील विविध सेवा संस्था काम करत होते, त्यातूनच महाराष्ट्रात निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे देशातील पहिले मंत्रालय आहे. आता इतर देशही त्याचे अनुकरण करत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सेवा विभग प्रमुख आणि विद्यमान अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी आपल्या मुख्य भाषणात दिव्यांग व्यक्तीनी केलेली असामान्य कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात रविवारी ते बोलत होते. पुण्यातील महर्षी कर्वे संस्थेत दोन दिवस हे अधिवेशन पार पडले. पुरी पुढे म्हणाले, राज्यात ८५० हून अधिक शाळांमधील ४० हजार दिव्यांगांसाठी शिक्षण दिले जाते. सरकार यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करत आहे.काही स्वंयसेवी संस्था सोबत ही काम करत आहे. पुण्यात मुरलीधर कचरे यांची वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्था, तेथे दिव्यांग मुलांसाठी सुरू असलेले शूटिंग रेंज, लातूर येथील दिव्यांग मुलांसाठी आय टी आय या संस्थांचे काम कौतुकास्पद आहे.
हिरेमठ म्हणाले, एकेक डिव्यांग व्यक्ती ही परिपूर्ण कशी बनेल याची जबाबदारी सामान्य समाजाने उचलली पाहिजे. सक्षम या कार्यात पुढाकार घेणारी देशव्यापी संस्था आहे. तत्पूर्वी एकल गीत सादर केल्यानंतर सक्षमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले अधिवेशनात सक्षमचे कार्यकर्ते प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करतील. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार यांचा विशेष सत्कार तसेच एकता अंकाचे प्रकाशन सक्षमचे संरक्षक डॉ. दयालसिंग पन्वांर, राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सदस्य सुहासराव हिरेमठ, संस्थापक मिलिंद कसबेकर, सहसचिव अभय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी संघटन मंत्र सादर करण्यात आले. सुमन चतुर्वेदी यांनी सक्षमच्या दृष्टिकोन आणि संकल्पना याविषयी माहिती दिली. स्वाती धारे यांनी स्वागत केले. महामंत्री उमेश अंधारे यांनी प्रास्ताविक केले. दुभाषा माधुरी गाडेकर यांनी भारतीय सांकेतिक भाषेतून संचालन केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. डॉ. प्रीती पोहेकर यांनी कल्याण मंत्र सांगितला. अंधारे यांनी सक्षमची नूतन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहिर केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments