Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुनी सांगवी आणि नवी सांगवी याठिकाणी अनधिकृत बांधकामावर पिंपरी -चिंचवड...

जुनी सांगवी आणि नवी सांगवी याठिकाणी अनधिकृत बांधकामावर पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे निष्कासनाची कारवाई

पिंपरी, दि. १० जून २०२४ : जुनी सांगवी आणि नवी सांगवी प्रभाग क्र.३१, ३२ याठिकाणी असलेल्या शितोळे नगर, ममता नगर, कवडे नगर, क्रांती चौक येथे अंदाजे ६००० चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या ४ आर.सी.सी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने ७ जून रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली २ जेसीबी, २ ब्रेकर ट्रक्टर, ७ मजूर, २० मनपा पोलीस आणि १४ एम.एस.एफ. जवान यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान उपअभियंता श्याम गरजे, कनिष्ट अभियंता प्रीती यादव, संदिप हजारे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विक्रम चव्हाण, संजय खंडागळे, सचिन भारती, शुभांगी चंदनकर, अतिक्रमण निरीक्षक रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments