Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत निवेदन

पिंपरी -चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत निवेदन

पिंपरी चिंचवड शहरातील व शहराच्या लगत असलेल्या नागरी भागातील वाढत्या नागरिकीकरणामुळे रस्त्यावरील वाहतुकीच्या वर्दळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस शहरातील व शहरा बाहेरील बाजूने मोठ्या संख्येने शहरातुन वाहतुक करुन आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहने उभी करत होते. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येस तोंड द्यावे लागत होते. शहरातील नागरिकांकरीता वाहतुक सुरळीत होणे व पार्किंगची सुविधा उपलब्ध होणे या उद्देशाने वाहतुक पोलिस व मनपाने संयुक्तपणे पे अँड पार्किंगची योजना धोरण शहरामध्ये विविध ठिकाणी प्रायोगिक तत्वावर चालु करणेचे नियोजन केले होते.

त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरात पार्किंग पॉलिसीच्या पे अँड पार्क योजनेच्या कामांची निविदा प्रसिद्ध करुन कार्यारंभ आदेश मे. निर्मला ऑटोकेअर सेंटर यांना दि.०७/०४/२०२१ रोजी देण्यात आला व त्या कामाचा कालावधी ३६ महिने इतका होता. सदर कामाची मुदत दि. ०६/०४/२०२४ रोजी संपुष्टात आल्याने आता मनपाने पे अँड पार्कची योजनेअंतर्गत मे. निर्मला ऑटोकेअर सेंटर यांचेमार्फत चालु असलेली शुल्क वसुली बंद केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments