Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedझिम्मड पाऊसगाणी' सांगीतिक कार्यक्रम शुक्रवारी 'आरव’, पुणे यांच्या वतीने आयोजन

झिम्मड पाऊसगाणी’ सांगीतिक कार्यक्रम शुक्रवारी ‘आरव’, पुणे यांच्या वतीने आयोजन

पुणे : ‘आरव’,पुणे निर्मित ‘झिम्मड पाऊसगाणी’ हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १४ जून सायंकाळी ५ वाजता रोजी सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक निखिल महामुनी हे यावेळी सादरीकरण करणार आहेत. त्यांना रेखा पाटणकर, अनुराधा गोगटे, ऋचा महामुनी, श्रीया महामुनी, सुशांत कुलकर्णी, गिरीश महामुनी, ऋतुराज कोरे, ओंकार पाटणकर, पराग जोशी हे साथ करणार आहेत. किरण पोतदार हे सूत्रसंचालन तर विजय पाटणकर निवेदन करणार आहेत.

कार्यक्रमात पावसाच्या विविध छटा उलगडणारी गाणी सादर होणार आहेत. यामध्ये काही गाजलेली मराठी गाणी त्यासोबतच निखिल महामुनी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादर होणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेशमूल्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments