Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसदोष डांबरीकरण आणि चेम्बर सफाई बाबत संदिप खर्डेकर यांचें मनपा आयुक्तांना निवेदन

सदोष डांबरीकरण आणि चेम्बर सफाई बाबत संदिप खर्डेकर यांचें मनपा आयुक्तांना निवेदन

पुणे+ अवकाळी आणि अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्वेनगर परिसरात निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत संदिप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,
अवकाळी आणि अल्पावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केल्याचे वाचनात आले, तर विविध सोसायट्यात ब्लॉक बसविल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा शोध देखील लागला असल्याचे वृत्तपत्रातून समजले.
साहेब, चूक मान्य करून ती दुरुस्त करून सामान्य पुणेकरांना दिलासा देऊन मनाचा मोठेपणा आणि कार्य कुशलता दाखवावी असे सुचवावेसे वाटते.
वानगी दाखल दोनच रस्त्यांची माहिती देतो, आपण प्रत्यक्ष येऊन बघा. महिन्याभरापूर्वी उत्तम डांबरीकरण केलेला समर्थ पथ ( अलंकार पोलीस स्टेशन ते प्रतिज्ञा मंगल कार्यालय ) आणि कर्वेनगर मधील कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज समोरचा पाणंद रस्ता !!
चार दिवसापूर्वीच्या अकल्पित पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते मात्र आज किरकोळ पाऊस झाला तरी जागोजागी तळं साचलेलं दिसतंय. हे डांबरीकरण नीट न झाल्यामुळे आहे असे स्पष्टपणे दिसत आहे.रस्त्याचा उतार, चेंबर चे ठिकाण,याचा अभ्यास न करताच डांबरीकरण केले जाते आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो.पावसाळी व ड्रेनेज लाईन्स च्या सफाई बाबत तर न बोललेलेच बरे.
समर्थ पथावर प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड पाणी साचले व तेथील सोसायटीत घुसलेले पाणी चार तासानंतर उपसता आले. गत वर्षी देखील येथे अशीच गंभीर स्थिती झाली होती व स्वतः आयुक्त विक्रमकुमार यांनी रात्री उशिरापर्यंत पाण्याचा निचरा होईपर्यंत तेथे थांबून मदतकार्य केले होते. यावर्षी याची पुनरावृत्ती होताना नागरिकांना प्रश्न पडला की ” येथे मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे प्रशासनाचे आश्वासन कुठे विरले ? मिळालेल्या माहितीनुसार यासाठी एक कोटीचे बजेट देखील मान्य झाले होते, ते कुठे गेले याची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी करत आहे.
आता टोलवा टोलवी न करता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अहवाल मागवावा व तेथे काय उपाययोजना करता येईल ते बघून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
मो 9850999995.
✅️ *महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता* ,भारतीय जनता पार्टी .🪷🎙️
✅ *समन्वयक, महायुती*, पुणे शहर, शिरूर व बारामती लोकसभा.🤝
✅️मा.अध्यक्ष ,संचालक,उद्यम विकास सहकारी बॅंक.⚙️
✅️अध्यक्ष, क्रीएटिव्ह फौंडेशन.💢
✅️ट्रस्टी, कर्वे समाज सेवा संस्था.💯
✅️संचालक,Hi5 ब्रॉडबॅंड सोल्यूशन्स.🛜
✅️प्रोप्रायटर,प्रणेती ईस्टेट कंसल्टंटस💰
✅️ पंचरत्न कॅन्स्ट्रक्शन, बांधकाम व्यवसायिक.🏠
✅️ संचालक, मॅगनम सोलर पॉवर.🌞
✅संस्थापक,ॲलर्ट (एन जी ओ ).🌈
✅️ अध्यक्ष, रोलबॉल संघटना महाराष्ट्र. 🏀🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments