Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंच.ईव्ही ही भारत-एनसीएपीकडून आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च स्‍कोअर्ससह ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग्‍ज मिळालेली भारतातील पहिली...

पंच.ईव्ही ही भारत-एनसीएपीकडून आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च स्‍कोअर्ससह ५-स्‍टार सेफ्टी रेटिंग्‍ज मिळालेली भारतातील पहिली व सर्वात सुरक्षित ईव्‍ही

मुंबई, १३ जून, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या टाटा मोटर्सची उपकंपनी आणि भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज मोठी घोषणा केली की पंच.ईव्ही आणि नेक्सॉन.ईव्ही ला ५-स्‍टार भारत-एनसीएपी सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. पंच.ईव्ही ने आतापर्यंत सर्वाधिक स्‍कोअर्स संपादित करत प्रमुख टप्‍पा स्‍थापित केला आहे, जेथे अडल्‍ट ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन (एओपी) आणि चाइल्‍ड ऑक्‍यूपण्‍ट प्रोटेक्‍शन (सीओपी) साठी अनुक्रमे ३१.४६/३१ व ४५/४९ पॉइण्‍ट्स संपादित केले आहे. तसेच, नेक्सॉन.ईव्ही ने एओपी व सीओपीसाठी अनुक्रमे २९.८६/३२ आणि ४४.९५/४९ पॉइण्‍ट्स स्‍कोअर केले. यासह, टाटा मोटर्स भारत-एनसीएपी आणि ग्‍लोबल-एनसीएपी चाचण्‍यांमध्‍ये ५-स्‍टार्स प्राप्‍त करणाऱ्या एसयूव्‍ही पोर्टफोलिओची सर्वात सु‍रक्षित श्रेणी असलेली एकमेव ओईएम आहे.

भारताचे माननीय रस्‍ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी म्‍हणाले, ”मी या उल्‍लेखनीय टप्‍प्‍यासाठी टाटा मोटर्सचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, जेथे नेक्सॉन.ईव्ही आणि पंच.ईव्ही ला भारत-एनसीएपी अंतर्गत ५-स्‍टार रेटिंग मिळाले आहे. हे प्रमाणन देशामध्‍ये सर्वात सुरक्षित वेईकल्‍स असण्‍याप्रती भारतीय सरकारच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे आणि भारतातील ऑटोमोबाइल उद्योगाला ‘आत्‍मनिर्भर’ करण्‍यामध्‍ये भारत-एनसीएपीच्‍या भूमिकेवर भर देते. भारत-एनसीएपी कार सुरक्षितता मानक भारताला जागतिक ऑटोमोबाइल हब बनवण्‍यासह आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये भारताची निर्यात क्षमता वाढवण्‍याप्रती सरकारचा दृष्टिकोन पूर्ण करण्‍यासाठी महत्त्वाचा आहे.”

या असाधारण उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”पूर्वी कमी चर्चा केल्‍या जाणाऱ्या सुरक्षिततेला आता भारतीय कार खरेदीदार अधिक प्राधान्‍य देतात. टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देतो, ज्‍यामुळे आम्‍ही उद्योग बेंचमार्क बनलो आहोत. आम्‍ही सुरक्षिततेबाबत संवादांना चालना देण्‍यामध्‍ये अग्रणी आहोत, ज्‍यामधून खात्री मिळते की किमतीकडे न पाहता आम्‍ही उत्‍पादित करणाऱ्या प्रत्‍येक वेईकलमधून आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही सरकारच्‍या शिस्‍तबद्ध सुरक्षितता मानकांचे स्‍वागत करतो आणि आम्‍हाला वेईकल्‍स वितरित करणारी, तसेच उच्‍च निष्‍पत्तींसह भारत-एनसीएपी प्रोटोकॉलचे नेतृत्‍व करणारी पहिली उत्‍पादक कंपनी असण्‍याचा अभिमान वाटतो. आम्‍हाला भारतातील सर्वात सुरक्षित वेईकल म्‍हणजेच ईव्‍ही पंच.ईव्ही उत्‍पादित करण्‍याचा आनंद होत आहे, तसेच नेक्सॉन.ईव्ही ने आपल्‍या ५-स्‍टार रेटिंगसह सुरक्षिततेचा वारसा कायम ठेवला आहे. एकत्रित, भारत-एनसीएपी अंतर्गत चाचण्‍या करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या चारही एसयूव्‍हींना ५-स्‍टार रेटिंग्‍ज मिळाले आहे, ज्‍यामुळे आगामी सर्व पॅसेंजर वेईकल्‍ससाठी बेंचमार्क स्‍थापित केला आहे. अधिक पुढे जात, सुरक्षिततेप्रती आमचा सक्रिय पवित्रा कायम राहिल, रत्‍स्‍यावरील प्रत्‍येक प्रवाशीसाठी सुरक्षित भविष्‍य निर्माण करण्‍याकरिता अग्रणी असण्‍यामध्‍ये आम्‍हाला विकसित व सक्षम करण्‍यास मदत करण्‍यासाठी व्‍यापक आरअॅण्‍डडीचे पाठबळ असेल.”

पंच.ईव्ही लाँच झाल्‍यापासून ईव्‍ही उत्‍साही आणि पहिल्‍यांदाच वेईकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्‍ये लक्षवेधक राहिली आहे, जेथे ग्रामीण बाजारपेठांमधून ३५ टक्‍क्‍यांहून अधिक मालक आहेत. लांबची रेंज, सर्वोत्तम कार्यक्षमता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि सामान्‍यत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या विभागांमध्‍ये आढळून येणारी वैशिष्‍ट्ये असलेल्‍या पंच.ईव्ही ने तिच्‍या समूहामधील १०,००० हून अधिक अभिमानी सदस्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही अस्‍सल इलेक्ट्रिक एसयूव्‍ही असण्‍यासोबत भावी गतीशीलतेच्‍या दिेशेने साहसी पाऊल देखील आहे. पंच.ईव्ही ने सोयीसुविधा व वजनाच्‍या बाबतीत देखील सर्वोच्‍च गुण संपादित केले आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना प्रीमियम अनुभव मिळतो.

Punch.ev

–

इतरांपेक्षा सर्वोत्तम सुरक्षितता

६ एअरबॅग्‍ज (प्रमाणित)

३६० डिग्री एसव्‍हीएस

इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (प्रमाणित)

ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटरिंग

ISOFIX (प्रमाणित)

एसओएस कॉलिंग

हिल होल्‍ड असिस्‍ट (प्रमाणित)

इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्‍ड

रोल ओव्‍हर मिटीगेशन (प्रमाणित)

चारही डिस्‍क ब्रेक्‍स

iTPMS (प्रमाणित)

हिल डिसेंट कंट्रोल

भारतातील ईव्‍ही क्रांतीची किकस्‍टार्टर म्‍हणून श्रेय देण्‍यात आलेल्‍या नेक्सॉन.ईव्ही ने २०२० मध्‍ये लाँच झाल्‍यापासून ६८,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. २०२३ मध्‍ये लाँच करण्‍यात आलेला एसयूव्‍हीचा अपडेटेड गेमचेंजिंग अवतार संपूर्ण भारतीय ऑटो उद्योगासाठी मोठी झेप आहे. या वेईकलची आकर्षक डिजिटल-केंद्रित डिझाइन, तंत्रज्ञान-संचालित ड्रायव्हिंग अनुभव आणि उल्‍लेखनीय इनोव्‍हेशन्‍स या वेईकलला सर्वोत्तम बनवतात आणि भारतीय ईव्‍ही उद्योगामध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित केले आहे.

Nexon.ev

–

गेम चेंजिंग सेफ्टी

६ एअरबॅग्‍ज (प्रमाणित)

३६० डिग्री एसव्‍हीएस

इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्रामसह iVBAC (प्रमाणित)

ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट मॉनिटरिंग

ISOFIX (प्रमाणित)

एसओएस कॉलिंग

हिल होल्‍ड असिस्‍ट (प्रमाणित)

इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्‍ड

रोल ओव्‍हर मिटीगेशन (प्रमाणित)

फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर

iTPMS (प्रमाणित)

चारही डिस्‍क ब्रेक्‍स

रिअर पार्किंग असिस्‍टसह कॅमेरा आणि सेन्‍सर (प्रमाणित)

हिल डिसेंट कंट्रोल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments