पुणे,13 जून, 2024: भारतातील टायर उद्योगामधील प्रमुख कंपनी जेके टायर अँड इंडस्ट्रीजने इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एका मोबिलिटीसोबत सहयोग केला आहे, तसेच मित्सुई कं. लि. (जपान) आणि व्हीडीएल ग्रुप (नेदरलँड्स) या इक्विटी सहयोगी आहेत.
हा सहयोग अद्वितीय क्लाऊड-आधारित मॉनिटरिंग सिस्टम ‘कनेक्टेड मोबिलिटी सोल्यूशन्स’ प्रदान करण्यामधील उद्योग अग्रणी म्हणून जेके टायरचे स्थान अधिक दृढ करतो. कंपनी आपल्या मोबिलिटी सोल्यूशन्स उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसमावेशक टायर व्यवस्थापन देते. पुणे येथे जेके टायरच्या फ्लीट मॅनेजमेंट अँड मोबिलिटी सोल्यूशन्सचे एव्हीपी श्री. संजीव शर्मा आणि एका मोबिलिटीचे अध्यक्ष श्री. विजयकुमार येलने यांच्या उपस्थितीत या दीर्घकालीन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
एका च्या ताफ्यासाठी जेके टायर आपल्या न्यू जनरेशन ईव्ही टायर्ससह रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी कनेक्टेड ट्रील सेन्सर्स प्रदान करेल. जेके टायरने डेपोंमध्ये अहोरात्र सपोर्ट देण्यासह साह्य करण्यासाठी अनुभवी व्यावसायिकांची समर्पित टीम तैनात केली आहे. मुंबईमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या ताफ्यासह कंपनी सर्व शहरांमधील EKA च्या ताफ्याला सर्वसमावेशक पाठिंबा देईल.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत जेके टायर अँड इंडस्ट्रीजच्या सेल्स अँड मार्केटिंगचे संचालक श्री. श्रीनिवासू अल्लपन म्हणाले, ”जेके टायरमध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादने प्रदान करत उद्योग परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहोत. आम्हाला सर्वसमावेशक मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यासाठी EKA मोबिलिटीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग टायर व्यवस्थापनामधील नाविन्यता व सर्वोत्तमतेप्रती आमच्या कटिबद्धतेशी संलग्न आहे, ज्यामधून आमच्या ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण गतीशीलता गरजांमध्ये अद्वितीय सेवा व पाठिंब्याची खात्री मिळते. तसेच, हा सहयोग पर्यावरणीय स्थिरता व उत्पादन सुधारणेप्रती आमच्या समर्पिततेला सादर करतो.”
एका मोबिलिटीचे अध्यक्ष श्री. विजयकुमार येलने म्हणाले, ”जेके टायरसोबतचा हा धोरणात्मक सहयोग एन्व्हायरोन्मेंट-कॉन्शियस मोबिलिटीसाठी इकोसिस्टम निर्माण करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. दोन्ही कंपन्या शाश्वततेप्रती कटिबद्ध आहेत आणि आम्ही एका च्या नाविन्यपूर्ण ईव्ही तंत्रज्ञानासह टायर उत्पादनामधील जेके टायरच्या कौशल्याला एकत्र करण्यास उत्सुक आहोत. आमचे संयुक्त कौशल्य नाविन्यपूर्ण सोल्यूशन्ससाठी मार्ग मोकळा करतील, जे इलेक्ट्रिक वेईकल्सची कार्यक्षमता वाढवण्यासह हरित व अधिक शाश्वत भविष्याप्रती योगदान देखील देतील.”
या सहयोगाचा न्यू जनरेशन ईव्ही टायर्सचा विकास व उत्पादनासह ईव्ही क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे. न्यू जनरेशन ईव्ही टायर्स विशेषत: इलेक्ट्रिक वेईकल्सच्या अद्वितीय मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
जेके टायर अत्याधुनिक मोबिलिटी सोल्यूशन्स देते आणि देशातील आघाडीच्या ब्रँड्सच्या ताफ्यांचे कार्यक्षमपणे व्यवस्थापन करते. जेके टायरचे कमर्शियल वेईकल्ससाठी न्यू जनरेशन ईव्ही टायर्स सानुकूल परफॉर्मन्स व कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे जेके टायर नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून टायर उद्योगामध्ये नाविन्यता व सर्वोत्तमता वाढवण्यामध्ये अग्रस्थानी आहे.
एका मोबिलिटी ही एकमेव भारतीय कंपनी आहे, जी भारतात तळागाळापर्यंत इलेक्ट्रिक न्यू एनर्जी कमर्शियल वेईकल्सची एण्ड-टू-एण्ड डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान प्रदान करते. गेल्या दोन वर्षांत कंपनीने इलेक्ट्रिक सिटी बस, स्टाफ कॅरियर व स्कूल बस, ९-मीटर हायड्रोजन फ्यूएल-सेल इलेक्ट्रिक बस सादर केले आहेत आणि भारतातील ग्राहक व व्यवसायांसाठी अनुकूल असण्याकरिता डिझाइन व कस्टमाइज करण्यात आलेल्या त्यांच्या ई-एलसीव्हींच्या श्रेणीसह लास्ट-माइल डिलिव्हरीची सुविधा देण्यास सज्ज आहे.
—


