Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedआत्मियता आणि आपुलकीची भावना हे जीवंत समाजाचे लक्षण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष...

आत्मियता आणि आपुलकीची भावना हे जीवंत समाजाचे लक्षण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत यांचे मत ; प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने शहराच्या पूर्व भागातील १२९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट उपक्रम

पुणे : आज जगामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक प्रकारच्या अनेक समस्या आहेत. भारतीय संस्कृतीमधील संस्कारमूल्यांमुळे आपल्याकडे त्या कमी प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे सगळे देश आपल्या संस्कृतीकडे पाहतात. समाजाला देण्याची मानसिकता भारतीयांमध्ये असून आत्मियता आणि आपुलकीची भावना हे जीवंत समाजाचे लक्षण आहे, असे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत यांनी व्यक्त केले.

गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठान व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार पेठेतील श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित कार्यक्रमात शहराच्या पूर्व भागातील १२९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सप्रेम भेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काची प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवराज काची, सेवा सहयोगचे शेखर अभ्यंकर, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख विजय चौधरी, शिवराज बलकवडे, अमोल थोरात, हेमराज साळुंके, ओमकार नाईक, कुणाल जगताप, गौरव मळेकर आदी उपस्थित होते. यावेळी १० वी व १२ वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

युवराज काची म्हणाले, कोणत्याही प्रकारची मदत देण्यापेक्षा सप्रेम भेट देण्याचा मंडळाचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. सण- उत्सवांसोबतच असे सामाजिक उपक्रम मंडळांनी राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेखर अभ्यंकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, यासाठी ही शैक्षणिक भेट दरवर्षी देण्यात येते. भविष्यात मोठे होऊन अशीच शैक्षणिक भेट या विद्यार्थ्यांनी पुढील पिढीला द्यायला हवी. तरच अशा उपक्रमांचा उद्देश सफल होईल.

किशोर चव्हाण म्हणाले, मागील ७ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. शहराचा पूर्व भाग हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे, तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी, या उद्देशाने प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांसाठी देखील विविध उपक्रम राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments