पिंपरी- भारताचा फार्मास्युटिकल उद्योग जेनेरिक औषधे आणि लसींच्या जागतिक उत्पादकांपैकी एक आहे, एकूण जागतिक मागणीच्या 20 टक्के आणि लसींच्या जागतिक मागणीच्या 60 टक्के पुरवठा करतो. भारताचा फार्मास्युटिकल उद्योग सध्या औषध उत्पादनासाठी जागतिक स्तरावर प्रमाणानुसार तिसरा आणि मूल्यानुसार 14 व्या क्रमांकावर आहे. देशात सुमारे 3,000 औषध कंपन्यांचे नेटवर्क आणि अंदाजे 10,500 उत्पादन युनिट्स असलेले देशांतर्गत फार्मास्युटिकल उद्योग सुस्थापित आहे.
फार्मास्युटिकल क्षेत्रातील आकर्षण असलेले फार्माएक्स एक्सपो चे यंदा पिंपरीतील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे २१ ते २२ जून रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हे दोन दिवसीय प्रदर्शन थर्ड पार्टी उत्पादनावर केंद्रित असेल. पीसीडी परवाना धारक, विविध संकल्पना, तंत्रज्ञान आणि उत्पादनांद्वारे भारतीय औषध उद्योगातील क्षमतांचे प्रदर्शन यामध्ये केले जाईल. तसेच १५० हून अधिक सादरकर्ते यामध्ये सहभागी होणार असून या क्षेत्रातील १०००० हून अधिक व्यावसायिक व अभ्यासक याला भेट देतील.
आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत फार्मास्युटिकल उद्योग ५७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि ऑपरेटिंग मार्जिनमध्ये १००-१५० बेस पॉइंट्सने वाढल्यामुळे, फार्मेक्स एक्स्पो २०२४ उद्योगांना जोडण्याचे काम करणार आहे. या कार्यक्रमाला सीनॅक, कॅस्का प्रायव्हेट लिमिटेड, सिग्ना, नेक्सकेम, सिग्मा सॉफ्टजेल प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य मिळाले आहे.
देवस्य मीडियाचे संचालक,शिवम शर्मा म्हणाले, “फार्माएक्स हे एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करणार असून, फार्मास्युटिकल क्षेत्रात सहयोग आणि नवकल्पना वाढवण्यात मदत करेन. उद्योग वाढ आणि विकसित ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर, हे प्रदर्शन नवीन संधी शोधण्यासाठी आणि बदलत्या प्रवाहाची दिशा दाखवण्यात भागधारकांना सहयोग करणारे ठरेल.”
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय फार्मा मार्केटमध्ये वर्षभरात सुमारे ५ टक्क्यांनी उल्लेखनीय वाढ दिसून आली,जी ४९.७८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, निर्यातीत माफक प्रमाणात वाढ झाली असून, देशांतर्गत बाजारात वार्षिक ७ टक्के वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन संघर्ष, अनेक आफ्रिकन देशांमध्ये परकीय चलनाचा तुटवडा आणि उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये स्थानिक चलनांचे लक्षणीय अवमूल्यन यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करून विकसित बाजारपेठांनी ८ टक्के वाढ नोंदवली आहे.
मागील काही काळात भारतीय फार्मास्युटिकल क्षेत्रातील अपेक्षित स्थिर वाढीचे श्रेय वृद्धांची अधिक लोकसंख्या,जीवनशैली संबंधित जुनाट आजारांमध्ये झालेली वाढ, आरोग्यसेवेतील जागरुकता, विमा क्षेत्रातील जागरुकता आणि विविध योजनां अंतर्गत वाढलेली सरकारी खर्च यांसारख्या संरचनात्मक घटकांना जाते. या व्यतिरिक्त, वाढती जागतिक लोकसंख्या आणि कठीण व विशेष जेनेरिक उत्पादनांचा प्रसार भारतीय फार्मा कंपन्यांच्या निर्यात वाढीस चालना देण्यासाठी तयार आहे. नियमन केलेल्या बाजार पेठेतील पेटंटच्या कालबाह्यतेमुळे या वाढीला अधिक चालना मिळेल.


