Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांना कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी इच्छापत्र पाठविण्याचे आवाहन*

बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांना कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी इच्छापत्र पाठविण्याचे आवाहन*

*

पुणे, दि. १९ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयात तसेच अंतर्गत असलेल्या शासकीय कार्यालयामध्ये ६ महिन्याच्या कालावधीसाठी पदांची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थाकडून वाहनचालक (कुशल), शिपाई व सफाईगार (अकुशल) ही कंत्राटी पदे भरण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांनी ७ दिवसांच्या आत दरपत्रक व इच्छापत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्तापेठ पुणे -११ येथे प्रत्यक्ष येवून अथवा दुरध्वनी क्रमांक २०-२६१३३६०६ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments