Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्राईस्ट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याने विमर्श: कॅनन नॅशनल युथ पार्लमेंट मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट संसदपटू...

क्राईस्ट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याने विमर्श: कॅनन नॅशनल युथ पार्लमेंट मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

पुणे, २१ जून 2024: क्राईस्ट युनिव्हर्सिटी, लवासा येथील बीए एलएलबी (ऑनर्स) चा विद्यार्थी,बी एस उदय किरण याला विमर्श: कॅनन नॅशनल यूथ पार्लमेंट मध्ये “सर्वोत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नुकतेच ऑनलाइन पद्धतीने पार पडलेला हा कार्यक्रम लाईव्हलॉच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कृत्रिम संसदीय प्रारूपात संपूर्ण भारतातील युवा प्रतिनिधींना एकत्र आणले होते. हे व्यासपीठ तरुण विचारांना रचनात्मक संवादात गुंतवून ठेवणारे होते. या स्पर्धेत चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांसह लोकसभा, राज्यसभा आणि ऑल इंडिया पॉलिटिकल पार्टी मीट (एआयपीपीएम) या तीन क्षेत्रांमधील वादविवाद आणि चर्चा यांचा समावेश होता.

उदय किरण याला पंतप्रधानाच्या भूमिकेत राहण्याची नामी संधी मिळाली. ही चर्चा “मेन्स्ट्रुअल हायजिन ऍट वर्क प्लेस -मेन्स्ट्रुअल लिव्ह पॉलिसी ” या अजेंडावर केंद्रीत होती,जो महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी संबोधित करणारा एक गंभीर व महत्वपूर्ण विषय आहे. संपूर्ण दोन दिवसीय कार्यक्रमात, उदय किरण यांनी उत्तमरीत्या चर्चा केली, चांगले संशोधन केलेले युक्तिवाद सादर केले आणि व्यवहार्य धोरणात्मक उपाय शोधण्यासाठी सहभागींसोबत सहयोग केला.

उदय किरण याची अनन्यसाधारण कामगिरी आणि योगदानाला आयोजन समितीच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली, आणि त्यांना “सर्वोत्कृष्ट संसदपटू” म्हणून सन्मानित करण्यात आले. उदय किरण यांची कामगिरी संसदीय चर्चेतील त्यांचे समर्पण आणि कौशल्याबरोबरच क्राईस्ट युनिव्हर्सिटी,पुणे, लवासा कॅम्पसमधील सहकाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments