पुणे,24 जून 2024 : आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने फ्रीडम फ्रॉम डायबेटिस इन्स्टिट्युट (एफएफडी) तर्फे रविवारी यश लॉन्स, बिबवेवाडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात तीन वेळा योग मध्ये जागतिक चॅम्पियन ठरलेल्या व योगमध्ये पीएचडी असलेल्या डॉ.पल्लवी कव्हाणे आणि एफएफडीचे संस्थापक डॉ.प्रमोद त्रिपाठी यांनी ध्यान आणि सूर्यनमस्कारसह योगासनांच्या प्रात्यक्षिकाद्वारे नेतृत्व केले.सर्व वयोगट आणि फिटनेस स्तरावरील सुमारे ४५० लोकांनी सहभाग घेतला.त्यातील अनेकांनी १०८ सुर्यनमस्कार पूर्ण केले.
या कार्यक्रमाला खडकवासलाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजन टीममध्ये डॉ.मल्हार गानला,डॉ.शुभंकर महापुरे,गायत्री ताटके,डॉ.रश्मी माथुर,स्नेहल हिंगमिरे,रणजित गवळी,मनाली शेलार,सुरेखा डांगे,शशांक कुलकर्णी इत्यादींचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी जीतो,संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सुर्यदत्ता कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि स्थानिक योग आणि हास्य क्लब्सने सहयोग केला. या उपक्रमाचा मुळ उद्देश मधुमेहाच्या व्यवस्थापनात योगच्या सकारात्मक प्रभावाविषयी जागरूकता वाढविणे आणि सहभागींना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा
होता.


