Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे पुणे शहरात आयोजन*

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे पुणे शहरात आयोजन*

 

पुणे, दि. २५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवसाचे औचित्य साधून समाजकल्याण विभागामार्फत २६ जून रोजी सकाळी ८.३० वाजता राजीव गांधी ॲकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा ते श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा पर्यंत विद्यार्थ्याच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये २६ जून ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात येतो. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या फेरीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्यायाचे महत्व सांगण्यात येणार असून व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन करण्यात येणार आइे.

 

विद्यार्थ्याची प्रभातफेरी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments