Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआधुनिक, साहसी आणि शक्तिशाली: स्‍कोडा ऑटो इंडियाने ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची डिझाइन झलक...

आधुनिक, साहसी आणि शक्तिशाली: स्‍कोडा ऑटो इंडियाने ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची डिझाइन झलक सादर केली

स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या पहिल्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या डिझाइनचा दुसरा टीझर

 

· विशेषत: भारतासाठी विकसित केलेल्‍या प्‍लॅटफॉर्मवर आधारित

 

· मॉडर्न सॉलिड तत्त्वांमधील डिझाइन शैलींची अंमलबजावणी

 

· २०२५ मध्‍ये भारतात जागतिक पदार्पण करणार

 

· ब्रँडच्‍या भारतातील सातत्‍यपूर्ण विकास लक्ष्‍याशी संलग्‍न असलेले उत्‍पादन

 

मुंबई, जुलै १५, २०२४ – स्‍कोडा ऑटो इंडिया जागतिक स्‍तरावर १२९वा वर्धापन दिन आणि भारतात २४वा वर्धापन दिन साजरा करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहे. वर्षभरात अनेक ग्राहक व उत्‍पादन उपक्रम राबवण्‍यासोबत २०२४ च्‍या सुरूवातीला ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची घोषणा केल्‍यानंतर स्‍कोडा ऑटो इंडियाने या ऑल-न्‍यू कारची दुसरी झलक सादर केली.

 

डिझाइन टीझरच्‍या रीलीजबाबत मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्‍हणाले, ”आम्‍ही २०२४ च्‍या सुरूवातीला आमच्‍या ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची घोषणा केली. २०२४ च्‍या मध्‍यादरम्यान आम्‍ही योग्‍य दिशेने वाटचाल करत आहोत. भारतातील रस्‍त्‍यांवर आमच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची प्रखर चाचणी घेतली जात आहे आणि आम्‍ही आमच्‍या उत्‍पादन तयारी, उच्‍च क्षमता आणि दर्जात्‍मक स्‍थानिक पुरवठादार सहयोगींसोबत सहयोगाने बारकाव्‍यांमध्‍ये सुधारणा करत‍ आहोत. नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही निश्चितच भारतातील रस्‍त्‍यांवर आमच्‍या युरोपियन तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करेल. सर्वात मोठ्या कार प्‍लॅटफॉर्मवर आधारित असलेल्‍या आमच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीच्‍या सुसंगत फूटप्रिंटमध्‍ये ‘बिग कार’चा अनुभव मिळेल, ज्‍यामुळे युरोपबाहेर स्‍कोडा ऑटोसाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाजारपेठ भारताप्रती आमच्‍या ब्रँड कटिबद्धतेशी संलग्‍न राहत नवीन कार ग्राहकांचे अधिक लक्ष वेधले जाईल. युरोपबाहेर उत्‍पादित केल्‍या जाणाऱ्या बहुतांश स्‍कोडा कार्स आमच्‍या स्‍थानि‍क फॅक्‍टरीजमध्‍ये निर्माण केल्‍या जातात आणि आम्‍ही स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित केलेल्‍या कार्स १४ देशांमध्ये निर्यात करत आहोत.”

 

डिझाइन

 

कुशक व स्‍लाव्हिया यांसारख्‍या मोठ्या कार्ससाठी विकसित करण्‍यात आलेले एमक्‍यूबी-एओ-इन प्‍लॅटफॉर्मवर आधारित स्‍कोडाची आगामी कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही ४-मीटर फूटप्रिंट कायम राखण्‍यासह मोठ्या कारप्रमाणे गतीशीलता, हाताळणी आणि रस्त्‍यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍याची खात्री देते. स्‍कोडा ऑटोच्‍या मॉडर्न सॉलिड डिझाइन शैलीमधून या एसयूव्‍हीची डिझाइन प्रेरित आहे. ऑल-न्‍यू कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही कंपनीच्‍या भारतातील मॉडर्न सॉलिड डिझाइन शैलीच्‍या पहिल्‍या अंमलबजावणीला सादर करेल. या कारमध्‍ये सुस्‍पष्‍ट व कमी केलेल्‍या लाइन्‍स आहेत, ज्‍यामधून स्‍कोडा कार्सचा साधेपणा, प्रबळता व दर्जा दिसून येतो.

 

 

 

डिझाइन दृष्टिकोन

 

डिझाइन टीमने या ऑल-न्‍यू एसयूव्‍हीला आकर्षक लुकसह फेण्‍डर्सभोवती शक्तिशाली शेप्‍स देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे, जेथे सुधारित स्‍टान्‍स आणि रस्‍त्‍यावर कारची लक्षवेधकता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. या स्‍कोडा वेईकलमध्‍ये उच्‍च ग्राऊंड क्‍लीअरन्‍स आणि रस्‍त्‍यांवरील असमान पृष्‍ठभागांचा सामना करण्‍यासाठी व्‍हीलभोवती स्‍पेस देखील असेल. तसेच कारमध्‍ये एसयूव्‍ही विशिष्‍टतेची भर करण्‍यात येईल. डिझाइनसंदर्भात पुढील बाजूस विशिष्‍ट स्‍कोडा एसयूव्‍ही शैली कायम ठेवण्‍यात येईल आणि सुधारित व अचूक डीआरएल लाइट सिग्‍नेचर्स यासारख्‍या वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात येईल. आगामी एसयूव्‍हीमध्‍ये कारच्‍या साइड व रिअरमध्‍ये षटकोनाकृती पॅटर्न देखील असेल, जे डिझाइनमध्‍ये अ

धिक आकर्षकतेची भर

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments