आर्थिक वर्ष २०२३-२४ जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी आव्हाने घेऊन आले होते. विविध स्थूल आर्थिक आणि भूराजकीय स्थितींमुळे बहुतेक ठिकाणी अनिश्चिततेचे वातावरण होते. चलनवाढीच्या दबावापासून ते नियमांमधील बदल व भूराजकीय ताणांपर्यंत अनेक घटकांनी जगभरातील व्यवसायांपुढील आव्हाने निर्माण करण्यात हातभार लावला.
चलनवाढ (महागाई) हाताळण्यासाठी प्रमुख मध्यवर्ती बँकांनी नाणिक धोरणाबाबत निर्बंधात्मक पवित्रे घेतले, त्यामुळे आर्थिक मंदीकडे वाटचाल सुरू झाली. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये तसेच काही उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मंदी येऊनही भारताने मात्र लक्षणीय स्थितीस्थापकत्व दाखवले. देशांतर्गत आर्थिक क्रियाशीलता भक्कम राहिली. उत्तम पतवाढ, कर व जीएसटीचे संकलन, ई-वे बिल्स, रेल्वेतील मालवाहतूक, हवाई प्रवाशांची वाहतूक आणि अशा अनेक सकारात्मक निदर्शकांच्या माध्यमातून ते स्पष्ट होते.
जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताकडे सर्वांचे लक्ष होते. कारण भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
मी आपल्या अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल खूपच आशावादी आहे. भारताच्या आर्थिक वाढीने जागतिक स्तरावरील अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी केली आहे. सरकारची भक्कम धोरणे, मजबूत स्थूल आर्थिक मुलभूत तत्त्वे, अंगभूत देशांतर्गत मागणी, वेळेत झालेला नियामक हस्तक्षेप आणि भारताच्या दीर्घकालीन वाढीची निश्चिती करणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणा या सगळ्या घटकांच्या मिलाफामुळे भारत आपली अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळू शकला.
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात आर्थिक वर्ष २४ मध्ये तब्बल ८.२ टक्क्यांनी वाढ झाली आणि आर्थिक वर्ष २५ मध्ये ते ७.२ टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर साधारण ४ टक्के असतो आणि विकसित देशांमध्ये तर तो आणखी कमी असतो.
२०२२ सालाच्या सुरुवातीला रशिया युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्या आणि एप्रिल २०२२ पासून भारतीय अर्थव्यवस्थेलाही चलनवाढीचे चटके बसू लागले. भारतीय रिझर्व बँकेने योजलेल्या उपायांच्या मालिकेमुळे चलनवाढीवर यशस्वीरित्या आळा घातला गेला.
चलनवाढीचे मुख्य अंग आता प्रामुख्याने आटोक्यात आहे. जून २०२४ मध्ये ते ३.१३ टक्के होते.
माझ्या मते, गेल्या ४ वर्षांत अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सरकार व आरबीआय दोघांनीही उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरण्यात भरीव योगदान मिळाले आहे.
आयुर्विमा उद्योग
आता मी आयुर्विमा उद्योगाकडे येतो. भारतातील आयुर्विमा उद्योगात नवीन व्यवसाय हप्ते आणि पॉलिसींची संख्या या दोन्ही निकषांवर आर्थिक वर्ष २४मध्ये २ टक्क्याने वाढ झाली. खासगी विमा क्षेत्रात त्याच वर्षात प्रिमियम (हप्ता) बेसिसमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली, तर पॉलिसींची संख्या ९ टक्क्यांनी वाढली. भारतीय आयुर्विमा कंपन्यांचे नवीन व्यवसाय प्रिमियम्स मार्च २०२४मध्ये समाप्त झालेल्या वर्षात विक्रमी ३.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
भारतात आयुर्विमा क्षेत्रातील संधी
▪ स्विस रेच्या मते भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या विमा बाजारपेठांपैकी एक आहे. २०३२ सालापर्यंत जर्मनी, कॅनडा व दक्षिण कोरियाला मागे टाकून भारत ६व्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ होईल असा अंदाज आहे. सध्या आपण विमा बाजारपेठेत १०व्या क्रमांकावर आहोत.
▪ भारत ही प्रामुख्याने विमा काढण्याचे प्रमाण कमी असलेली बाजारपेठ असल्यामुळे, वाढीची संभाव्यता प्रचंड आहे. भारतातील एकंदर विमा काढण्याचे प्रमाणे खूपच कमी म्हणजे ३.२ टक्के आहे.
▪ देशात विमा काढण्याचे कमी प्रमाण बघता, श्रेणी २ व श्रेणी ३ शहरांमध्ये विस्तार केल्यास वाढीला आणखी चालना मिळणे अपेक्षित आहे.
गेल्या दोनेक वर्षात नियामक यंत्रणांद्वारे ‘२०४७ सालापर्यंत सर्वांसाठी विमा’ या उद्दिष्टाच्या दिशेने काम सुरू आहे. काही लक्षणीय नियामक उपक्रम खाली दिले आहेत:
१. व्यवस्थापनाच्या खर्चामुळे व्यावसायिक व कार्यात्मक लवचिकतेत वाढ
२. उपकर्ज उभे करण्याच्या मर्यादांमध्ये वाढ
३. विस्तार, वाहक व सुगम ही विम्याची त्रिसूत्री
४. राज्यस्तरीय विमा समित्यांचा परिचय
५. नियामक यंत्रणांच्या परवानगीशिवाय नवीन शाखा उघडण्याची मुभा खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे तसेच अलीकडेच ग्राहकांनी पॉलिसी लवकर सरेंडर केल्यास वाढीव पेआउट्स देऊ केले जाऊ लागले आहेत.
आयआरडीएआय बँकिंग क्षेत्राप्रमाणे येथेही जोखीम आधारित पर्यवेक्षण प्रारूप तयार करण्यावर विचार करू शकते. कामकाजातील, बाजारपेठेतील व प्रशासनातील जोखमींच्या व्यवस्थापनासाठी आयआरडीएआय मार्गदर्शक तत्त्वे घालून देईल; आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी विमा कंपन्यांवर असेल.
या नियमांमुळे व्यवसाय करण्यातील सुलभता वाढेल, दीर्घकालीन उत्पादनांच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल आणि सातत्य वाढेल, त्यायोगे ग्राहकांसाठी मूल्यनिर्मिती होईल.
एचडीएफसी लाइफच्या कामगिरीबद्दल ताजी माहिती
या वर्षादरम्यान तुमच्या कंपनीने सामान्य बेसिसवर ११ टक्के वाढीची नोंद केली आणि असमायोजित डब्ल्यूआरपी बेसिसवर १ टक्का वाढ साध्य केली. ५ लाख रुपयांपर्यंतच्या तिकिट आकारमानात आर्थिक वर्ष २४ मध्ये तब्बल १९ टक्के वाढ झाली.
खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये एचडीएफसी लाइफने बाजारपेठेत १५.४ टक्के वाटा मिळवला आणि एकंदर बाजारपेठेतील कंपनीचा वाटा १०.४ टक्के राहिला. तुमची कंपनी सातत्याने उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्यांमध्ये आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी उपलब्ध माहितीनुसार, आपला एयूएम (व्यवस्थापनाखालील मालमत्ता) २.९२ कोटी रुपये मूल्याच्या आहेत आणि आपले संलग्न (एम्बेडेड) मूल्य ४७,४६८ कोटी रुपये आहे. आपले पतदारी मूल्य निकोप म्हणजे १८७ टक्के आहे आणि या आर्थिक वर्षात आपले नवीन व्यवसाय मार्जिन २६.३ टक्के आहे. निव्वळ मुदत उत्पादनांमधील वाढ, प्रिमियम उत्पादनांमधील परतावा आणि बचत व गुंतवणूक योजनांमधील अधिक संरक्षण यांच्या माध्यमातून आपण व्यक्तिगत हमी रकमेत ४७ टक्के वाढ साध्य केली आहे.
आर्थिक वर्ष २४ मध्ये आणखी ६.६ जणांचा विमा काढून आपण ग्राहकांचा समूह अधिक खोलवर नेला आहे. या रिटेल ग्राहकांपैकी ७० टक्क्यांहून अधिक एचडीएफसी न्यू साठी नवीन आहेत आणि यातील निम्मे ३५ वर्षांहून कमी वयोगटातील आहेत. ग्राहकतळ विस्तारण्याच्या आपल्या स्पष्ट उद्दिष्टाशी सुसंगती राखत, या वर्षात इश्यू झालेल्या पॉलिसींच्या संख्येतही ११ टक्के वाढ झाली आहे.
नूतनीकरणाद्वारे झालेले संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे. याचाच अर्थ आपल्या ग्राहकांचा आपल्यावरील विश्वास कायम आहे. १३व्या महिन्यात व ६१व्या महिन्यात टिकून राहण्याचे प्रमाण अनुक्रमे ८७ टक्के व ५३ टक्के होते.
उपकंपन्यांबद्दलची ताजी माहिती
एचडीएफसी पेन्शन मॅनेजमेंट कंपनी या आपल्या उपकंपनीने ७५,००० कोटी एयूएमचा टप्पा पार करत मोठे यश मिळवले आहे. या कंपनीने ७० टक्के एवढी भरीव वाढही साध्य केली आहे. निवृत्तीवेतन प्रवर्गातील बाजारपेठेतील आघाडी आपण कायम राखली आहे. रिटेल व कॉर्पोरेट क्षेत्रात आपण ४३ टक्के एवढा वर्चस्व गाजवणारा वाटा बाजारपेठेत प्राप्त केला आहे.
शिवाय, एचडीएफसी इंटरनॅशनल लाइफ अँड री कंपनी लिमिटेड या आपल्या उपकंपनीच्या माध्यमातून आपण गिफ्ट सिटी व्यवसायासाठी विस्ताराच्या योजना सक्रियतेने पुढे नेत आहोत. यूएस डॉलर शैक्षणिक योजना आणि ग्लोबल स्टुडण्ट हेल्थ केअर प्लान यांसारख्या नवोन्मेष्कारी यूएस डॉलर परिमाणातील आयुर्विमा व आरोग्यविमा बाजारात आणून आपण अनिवासी भारतीय प्रवर्गात प्रवेश केला आहे.
सारांश
शेवटी मी एवढेच सांगेन की, एचडीएफसी लाइफने गेल्या अनेक वर्षांत वेगवेगळ्या व्यवसाय चक्रांमधून वाट काढत अनमोल अनुभव गाठीशी जोडला आहे. आपण आपल्या उत्पादन नवोन्मेषात व वितरण क्षमतांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आलो आहोत आणि परिणामी आपण एक विविधीकृत वितरण फ्रँचायझी उभी केली आहे. हे प्रारूप वाढ व नफाक्षमतेतील सातत्य टिकवून धरू शकते.
अचूक पद्धती वापरून आपले अस्तित्त्व विस्तारण्याच्या माध्यमातून स्थूल संधींचा लाभ घेणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण यंत्रणेत तंत्रज्ञानाधारित रूपांतरण घडवून आणण्याच्या माध्यमातून आपण भविष्यकाळासाठी सुसज्ज व्यवसाय उभारत आहोत. याद्वारे ग्राहकांना आपण सर्वोत्तम दर्जाचा अनुभव देऊ शकतो.
आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या अमूल्य ग्राहकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.
शिवाय, मी आपल्या सर्व समर्पित कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. त्यांची अविचल बांधिलकी आणि परिश्रम आपल्या यशात महत्त्वपूर्ण ठरले आहेत. आपल्या सर्व समभागधारकांच्या पाठिंब्याबद्दलही मी ऋणी आहे. त्याचप्रमाणे आयआरडीएआयने उद्योगक्षेत्राला सक्षम केल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. शेवटचे पण महत्त्वाचे, मी आमच्या सर्व संचालकां
नी वर्षभर दिलेल्या मार्गदर्शनासाठी त्यांचा आभारी आहे.


