Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा अंकुश भडक मानकरी...

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा अंकुश भडक मानकरी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे आयोजन

पंढरपूर , दि. १५ जुलै: ५६ ते ६५ वयोगटातील जालना येथील अंकुश भडक हे श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेचे मानकरी ठरले, ७० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील परभणी येथील सखाराम नजान यांनी ज्येष्ठ वारकरी महावीर किताब मिळवला, तर १६ ते २५ वयोगटातील नांदखेडा येथील अनिल राजगुरे हे कुमार वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.

 

मानाचा फेटा, माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा शाल, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

या स्पर्धेमध्ये सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, औसा, लातूर व कर्नाटक येथील जवळपास २५० पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.

 

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाखरी, पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी, विश्वशांती गुरुकुल परिसरात वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

या वेळी हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, कॅनडा निवासी रवी जोशी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत.

 

तसेच, विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड, ह भ प तुळशीराम दा कराड, प्रगतशील शेतकरी काशीराम दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, डॉ. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, श्रीकांत देशमुख, वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.

 

बाबा निम्हण यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले.

 

तर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच निखल वणवे, राहुल बिरासदार, रोहित बागवडे, बाळासाहेब सणस, सुरेश मुंडे आणि नितिन लावंड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले.

 

विलास कथुरे यांनी प्रस्तावना केली.

 

विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणे –

 

वयोगट प्रथम सुवर्ण द्वितीय रौप्य पदक तृतीय कांस्य पदक

 

१६ ते २५ अनिल राजगुरे (नंदाखेडा) वैभव जोगदंड ( नांदेड) हनुमान जोगदंड ( नांदेड)

 

२६ ते ३५ लक्ष्मण करे (बीड) प्रवीण वाघमारे (सांगली ) सचिन नरळे (सोलापूर)

 

३६ ते ४५ सचिन शिंदे (बार्शी) संतोष भोबे (जालना ) नागनाथ अलेवांर (हिगोली)

 

४६ ते ५५ अर्जुन राहाडे (बीड) ध्यानदीप पाटील (कणदुर) तानाजी लांडगे (सदाशिवनगर)

 

५६ ते ६५ अंकुश भडक (जालना) शंकर आडकर (पुणे) अशोक चव्हाण (धाराशिव)

 

७० वर्षा पुढील सखाराम नजान (परभणी) बळीराम बहिरावळ (बीड) वसंत जावळे (धाराशिव)

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments