Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडियातर्फे गिफ्ट कार्ड्स लाँच, गिफ्टिंग होणारं सोपं

एयर इंडियातर्फे गिफ्ट कार्ड्स लाँच, गिफ्टिंग होणारं सोपं

गुरुग्राम, १६ जुलै २०२४ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमान कंपनीने एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स लाँच केली असून त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रियजनांना प्रवासाचा आनंद मिळवून देण्याचा सोपा व सोयीस्कर मार्ग उपलब्ध झाला आहे.

 

एयर इंडिया गिप्ट कार्ड्स ही ई- कार्ड्स आहेत, जी ऑनलाइन आणि १००० रुपये ते २,००,००० रुपयांदरम्यान कोणत्याही रकमेमध्ये आपल्या प्रियजनांसाठी खरेदी करता येतील किंवा भविष्यातील वापरासाठी बचत करता येतील.

 

एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स कंपनीचे संकेतस्थळ किंवा मोबाइल अ‍ॅपवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा बुक करण्यासाठी किंवा इतर पूरक सेवा उदा. अतिरिक्त बॅगेज, सीट सिलेक्शन इत्यादीसाठी वापरता येतील. अशाप्राकरे एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स विविध प्रकारे वापरता येतील आणि प्रवाशांना ती वापरताना आपल्या पसंतीचे ठिकाण, प्रवासाच्या तारखा, प्रवासाचा केबिन क्लास, एक्स्ट्राज समाविष्ट करण्यासाठी, प्रवास हव्या त्या पद्धतीने आखण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणूनच ही कार्ड्स प्रियजनांना भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

 

एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स giftcards.airindia.com वर चार थीम्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत – प्रवास, लग्नाचा वाढदिवस, वाढदिवस आणि खास क्षण. शिवाय, ही कार्ड्स सहजपणे पर्सनलाइज करता येण्यासारखी आहेत.

 

एयर इंडिया गिफ्ट कार्ड्सची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

 

· सोयीस्कर वितरण – एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स लगेच वापरण्यासाठी किंवा खरेदीनंतर ६० दिवसांत वापरण्यासारखी आहेत.

 

 

 

· हस्तांतरण करण्यासारखी : ही कार्ड्स हस्तांतरित करण्यासारखी असल्यामुळे इतरांसाठी विमानसेवा आरक्षित करताना वापरता येतील.

 

 

 

· एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स एकत्रीकरण : प्रवाशांना एकाच व्यवहारात तीन कार्ड्स एकत्र करून वापरता येतील. त्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी क्रेडिट कार्डचाही वापर करता येईल.

 

 

 

· बहुपयोगी: एयर इंडिया गिफ्ट कार्ड्स एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या बुकिंग्जसाठी वापरता येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments