सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात घट झाल्यामुळे उद्योग आणि बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी दिली. सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होऊन 6 टक्क्यांपर्यंत व प्लॅटिनमच्या आयात शुल्कात घट होऊन 6.4 टक्क्यांपर्यंत करण्याच्या निर्णयाचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या उद्योगाची बऱ्याच काळापासून ही मागणी होती आणि याचा उद्योगातील कंपन्यांवर आणि उद्योगाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. आयात शुल्क कमी झाल्याने सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच विक्रमी पातळीवर गेलेल्या सोन्याच्या किमती निवळतील.
आयात शुल्कात घट झाल्यामुळे फक्त उद्योगालाच नाही तर ग्राहकांना देखील दिलासा मिळणार आहे. उद्योगातील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि बेकायदा तस्करीला आळा घालण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे उद्योग आणि बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम अपेक्षित असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो
.


