Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 रोजी खुला होणार

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 रोजी खुला होणार

ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडच्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेयरसाठी 440 ते 465 रुपयांदरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

 

· अँकर गुंतवणूदारांना सोमवार, 5 ऑगस्ट 2024 रोजी बोली लावता येईल.

 

· बोली/ऑफर खुली होण्याची तारीख: मंगळवार, 6 ऑगस्ट, 2024

 

· बोली/ऑफर बंद होण्याची तारीख: गुरुवार, 8 ऑगस्ट, 2024

 

· कमीत कमी 32 इक्विटी समभागांची आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 32 च्या पटीत बोली लावता येतील.

 

· फ्लोर प्राईस इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 220 पट आणि कॅप प्राईस 232.5 पट असेल.

 

 

 

मुंबई, 1 ऑगस्ट, 2024: ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडने आपला आयपीओ मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 रोजी खुला केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. बोली/ऑफर गुरुवार, 8 ऑगस्ट, 2024 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूदारांना कामकाजाच्या एक दिवस आधी सोमवार, 5 ऑगस्ट 2024 रोजी बोली लावता येईल.

 

 

 

ऑफरसाठी प्राईस बँड प्रत्येक इक्विटी शेयरसाठी 440 ते 465 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 32 इक्विटी समभागांची आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास 32 च्या पटीत बोली लावता येतील.

 

 

 

ऑफरमध्ये एकूण 16,660.00 मिलियन रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 54,359,733 पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे. विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 46,814,458 पर्यंत इक्विटी समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या कॉर्पोरेट समभागधारकांकडून आणि प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 7,545,275 पर्यंत इक्विटी समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारक व्यक्तींकडून प्रस्तुत केले जातील.

 

 

 

या ऑफरमध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, 30.00 मिलियन रुपयांपर्यंतचे काही इक्विटी समभाग, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. हा भाग वजा करता उरलेला भाग म्हणजे “नेट ऑफर” आहे.

 

 

 

रेड हेरिंग प्रोस्पेकटसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. इक्विटी समभाग सूचिबद्ध करण्यासाठी बीएसई आणि एनएसईने कंपनीला तत्त्वतः मान्यता दिली आहे (दिनांक 16 मे 2024 रोजीच्या पत्रानुसार)

 

 

 

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि अवेन्डस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटे

ड आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments