Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedवक्ता प्रशिक्षण कार्यशाळा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी हर घर सावरकर समिती महाराष्ट्र...

वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजन

पुणे : हर घर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित नि:शुल्क वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे हा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती हर घर सावरकर समितीचे देवव्रत बापट यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे चेअरमन रवींद्र साठे आणि सात्यकी सावरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.

हर घर सावरकर समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हर हर सावरकर समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यात नि:शुल्क निवासी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र, कार्य आणि विचार यांचा प्रचार आणि प्रसारासाठी नवीन वक्ते तयार करणे हा वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचा मूळ उद्देश आहे. उत्तम दहा वक्त्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments