Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोथरुडच्या महिलांकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना अकरा हजार राख्यांची भेट ...

कोथरुडच्या महिलांकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना अकरा हजार राख्यांची भेट लाडकी बहीण योजना’ यशस्वी; शाम देशपांडे यांच्याकडून राज्य सरकारचे आभार.

पुणे, तारीख 20 ऑगस्ट : राज्यातील महायुती सरकारने आपल्या महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा १५००/₹ रक्कम जमा करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. एका बाजूला आपण अनेक योजना फक्त कागदावरच राहिलेल्या बघतो, परंतु आपले महायुतीचे सरकार हे ‘दिलेला शब्द पाळणारे’ सरकार आहे असे ठाम प्रतिपादन भाजप पुणे शहर उपाध्यक्ष आणि कोथरुड व्यासपीठ चे संस्थापक शाम देशपांडे ह्यांनी केलं आहे.

 

रक्षाबंधनाचे औचित्य साधून कोथरूड मधल्या जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ह्या कार्यक्रमात कोथरूड मधल्या पाच हजार महिलांनी, मुख्यमंत्री मा. एकनाथ जी शिंदे , उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित जी पवार यांना अकरा हजार राख्यांची भेट पोस्टद्वारे पाठवली.

 

त्यावेळी शाम देशपांडे यांनी परिसरातल्या अनेक महिलांशी लाडकी बहीण योजेनच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.

“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अत्यंत यशस्वी होत असल्याचं पाहून लाभार्थी महिलांना खूप समाधान वाटले. त्याच सोबत महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक आणि मूलगामी परिणाम साधणारी योजना राबवल्याबद्दल महिलांनी महायुती सरकारचे मनापासून आभार मानले आहेत अशी माहिती शाम देशपांडे यांनी दिली.

 

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments