भारतातील सर्वात मोठा ई-कॉमर्स सक्षम सॉफ्टवेअर-अॅज-ए-सर्व्हिस (“SaaS”) प्लॅटफॉर्म युनिकॉमर्स ईसोल्यूशन्स लिमिटेड (“द कंपनी”) हा ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील (स्रोत: Redseer रिपोर्ट) महसुलाच्या दृष्टीने व्यवहार प्रक्रिया स्तरातील प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी प्राथमिक समभाग विक्रीसाठी त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे दाखल केला आहे.
आथिर्क वर्ष २०२२ मध्ये भारतातील या विभागातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये युनिकॉमर्स ही एकमेव नफा मिळवणारी कंपनी आहे (स्रोत: Redseer रिपोर्ट). २०१२ मध्ये स्थापन झालेली युनिकॉमर्स ही आर्थिक वर्ष २१ पासून PAT-पॉझिटिव्ह आहे. डीआरएचपी नुसार कंपनीचा नफा आणि वाढीचा सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत अनुक्रमे आर्थिक वर्ष २३ आणि आर्थिक वर्ष २२ मध्ये ५२.५६% आणि ४७.५५% वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीसाठी, युनिकॉमर्सने १०३.७४ कोटी रुपयांचा वार्षिक रिकरींग महसूल (ARR) प्राप्त केला.
या ऑफरमध्ये “विक्री समभागधारकांकडून” (“विक्रीसाठी ऑफर”) चे प्रती इक्विटी शेअर १ रु. दर्शनी मूल्य असलेले २,९८,४०,४८६ पर्यंतचे इक्विटी समभाग एकत्रितपणे विक्रीसाठीच्या ऑफर मध्ये समाविष्ट आहेत. विक्रीच्या ऑफरमध्ये AceVector Limited (पूर्वी स्नॅपडील लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) द्वारे १,१४,५९,८४० पर्यंतच्या; B2 कॅपिटल पार्टनर्स तर्फे २२,१०,४०६ पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि एसबी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स (यूके) लिमिटेड (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) द्वारे १,६१,७०,२४० पर्यंतचे इक्विटी शेअर्स समभागांचा समावेश आहे
अँकरेज कॅपिटल फंड, माधुरी मधुसूदन केला, रिझवान कोईटा आणि जगदीश मुरजानी, दिलीप वेल्लोडी आणि इतरांसह नामांकित गुंतवणूकदारांच्या गटाने अलीकडेच कंपनीचे शेअर्स घेतले.
आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
SaaS सोल्यूशन्सचा कंपनीचा संच ब्रँड, किरकोळ विक्रेते, मार्केटप्लेस आणि लॉजिस्टिक सेवा पुरवठादारांसाठी ई-कॉमर्स ऑपरेशन्सचे एंड-टू-एंड व्यवस्थापन सक्षम करतो.
युनिकॉमर्स भारतातील महत्वपूर्ण क्लायंटना एक मोठी आणि वाढीव आधारभूत सेवा देते. यामध्ये लेन्सकार्ट, फॅबइंडिया, झिवामे, टीसीएनएस, ममाअर्थ, इमामी, शुगर, बोएट, पोर्ट्रोनिक्स, फार्मइझी, जीएनसी, सेलो, अर्बन कंपनी, मेन्सा, G.O.A.T, शिप्रॉकेट, एक्सप्रेसबीज आणि इतरांचा समावेश आहे.
३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीचा ७४३ एंटरप्राइझ क्लायंट आणि २,८३० एसएमबी क्लायंटसाठी ७६३.८२ दशलक्ष ऑर्डर आयटमवर प्रक्रिया करण्याचा वार्षिक रन-रेट होता. Redseer अहवालानुसार कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताच्या ई-कॉमर्स ड्रॉपशिप व्हॉल्यूमच्या अंदाजे २०-२५% प्रक्रिया केली.
भारताव्यतिरिक्त, जिथे युनिकॉमर्सचे बहुसंख्य ग्राहक आहेत तिथे प्रामुख्याने आग्नेय आशिया आणि मध्य पूर्व येथील सहा इतर देशांत कंपनीचे देखील ग्राहक आहेत.
२०२७ मध्ये व्यवहार प्रक्रिया लेयर मध्ये ई-कॉमर्स सक्षमीकरण SaaS मधील कंपन्यांसाठी एकूण अॅड्रेसेबल मार्केट (“TAM”) अंदाजे ४.१ अब्ज अमेरिकन डॉलर असणे अपेक्षित आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स मार्केट (२०२७ पर्यंत 25% च्या CAGR ने वाढून अंदाजे १७० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज), वाढत्या शिपमेंटचे प्रमाण, D2C ब्रँडचा उदय, पारंपारिक ब्रँडचे सर्वचॅनेलमध्ये संक्रमण आणि भारतातील वेअरहाउसिंग उद्योगाचा विस्तार यामुळे वाढीस चालना मिळते.
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल मखिजा यांच्या नेतृत्वाखाली युनिकॉमर्सचे काम सुरू आहे. युनिकॉमर्सने नुकतेच मनोज कोहली, उल्लास कामथ आणि सायरी चहल यांना स्वतंत्र संचालक म्हणून आणि कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक म्हणून समाविष्ट करून आपल्या संचालक मंडळाचा विस्तार केला आहे.


