मुंबई, सप्टेंबर ४, २०२४: ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर, अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेडचे मुख्य ब्रॅण्ड अधिकारी व अध्यक्ष श्री. पार्थ सिन्हा यांची २०२४-२५ साठी एएससीआय बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. सुधांशू वत्स यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि लिंटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुप सीईओ व चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर-एपीएसी श्री. एस. सुब्रमण्येश्वर यांची मानद कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
श्री. सिन्हा यांच्याकडे बेनेट कोलमन, ऑग्लिव्ही, पब्लिसिस, बीबीएच, मॅककॅन आणि सिटीबँक अशा आघाडीच्या कंपन्यांसोबत काम करण्याचा समृद्ध व विस्तृत अनुभव आहे. ब्रॅण्ड मार्केटिंग, माध्यमे आणि कम्युनिकेशन्स या क्षेत्रांवर त्यांची पकड आहे.
श्री. पार्थ सिन्हा यांनी एएससीआयसाठी वैशिष्ट्यपूर्ण उद्दिष्टे व्यक्त केली आहेत. “एएससीआयच्या चेअरपर्सनचे पद म्हणजे सन्मान आणि मोठी जबाबदारी दोन्ही आहे. विशेषत: सध्या आपल्या उद्योगक्षेत्रावर समभागधारकांची अधिक बारीक नजर असल्यामुळे ही जबाबदारी वाढली आहे. डिजिटल वातावरणात वेगाने होत असलेले बदल आणि नवीन आव्हानांच्या उदयामुळे सर्वांचेच लक्ष या क्षेत्रावर आहे. एएससीआय या बदलांशी जुळवून घेण्यासाठीच नव्हे तर पुढे राहण्यासाठी बांधील आहे. सदोष जाहिरातींवर देखरेख ठेवण्यासाठी तंत्रज्ञान तसेच एआयचा वापर करणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपली शक्ती वापरणे यावर आम्ही पहिल्या काही दिवसांत भर देणार आहोत. त्यामुळे सर्जनशीलता व जबाबदारी या दोन्ही घटकांचे अस्तित्त्व टिकून राहील, ग्राहकांना महत्त्व देणारी व नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी परिसंस्था यामुळे निश्चितपणे तयार होईल.”
मावळते अध्यक्ष श्री. सौगत गुप्ता आपल्या कार्यकाळाबद्दल म्हणाले, “लक्षणीय विकास व बदलाच्या कालखंडात एएससीआयचे नेतृत्व करणे ही विशेष बाब आहे. या वर्षात अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले गेले. यामध्ये एएससीआय अकॅडमीच्या स्थापनेचा समावेश होतो. जबाबदार आणि प्रगतीशील जाहिरातींना उत्तेजन देण्यामध्ये ही अकॅडमी आधारस्तंभ झाली आहे. प्रशिक्षण व क्षमताबांधणी, आमच्या वैचारिक नेतृत्वाच्या माध्यमातून नवीन दिशा देणे यांप्रती आमच्या बांधिलकीतून सर्व स्तरांवरील जबाबदारीची संस्कृती दिसून येते.”
एएससीआयने या वर्षभरात यशाच्या आणि धोरणात्मक उपक्रमांच्या निकषांवर मोठी प्रगती साध्य केली आहे. एएससीआय अकॅडमी सुरू झाल्यापासून संस्थेची सक्रिय कामाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. अकॅडमीचा विस्तार हे एएससीआयच्या उपक्रमांचे महत्त्वाचे अंग आहे, उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने प्रशिक्षण व शिक्षण देणारी सक्रिय समर्थक बनण्याच्या दृष्टीने अकॅडमी वेगाने वाटचाल करत आहे. स्थापनेपासून कंपनीने विस्तार करत ७५ हून अधिक सहयोग केले आहेत आणि आपल्या प्रशिक्षण व शिक्षणाच्या माध्यमातून ३३,३०० नवोदित व उदयोन्मुख व्यावसायिकांच्या करिअरवर प्रभाव टाकला आहे, जाहिरात क्षेत्रामध्ये नैतिक तत्त्वे खोलवर रुजवण्याचे काम अकॅडमी ठामपणे करत आहे.
एएससीआयने सहयोगात्मक प्रकल्पांच्या माध्यमातून संशोधनात सक्रिय सहभाग घेतला आहे. यातील लक्षणीय भागीदारींपैकी एक म्हणजे खैतान अँड कंपनीशी झालेली भागीदारी होय. या सहयोगाद्वारे जाहिरात क्षेत्रावरील जनरेटिव एआयच्या परिणामाबद्दल श्वेतपत्रिका तयार करण्यात आली. संयुक्तराष्ट्रांच्या स्त्री विभागाच्या नेतृत्वाखालील अनस्टिरिओटाइप्ड अलायन्स आणि आघाडीची संशोधन संस्था कंतारसोबत भारतात डीअँडआयवर केलेले संशोधनही महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर खासगीत्व आणि डेटा संरक्षण या संकल्पना सखोल समजावून घेण्यासाठी संस्थेने लेएक्स्प्लोजनशी सहयोग केला आहे.”
गेल्या वर्षात एएससीआयने संबंधित व सरकार यांच्या अनेक चर्चासत्रांचे सहआयोजन सक्रियपणे केले, तसेच अशा सत्रांमध्ये सहभागही घेतला. डार्क पॅटर्न्स, ग्रीन क्लेम्स तसेच सरोगेट अॅडव्हर्टायजिंग यांसारख्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी व उपाय शोधण्यासाठी ही चर्चासत्रे घेण्यात आली.
एएससीआयने या वर्षात अनेक प्रवर्गांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणली तसेच अद्ययावत केली. यामध्ये फसव्या जाहिराती, सेवाभावी कामाचे मार्केटिंग आणि पर्यावरणपूरक दावे करणाऱ्या जाहिराती यांच्यासह अन्य काही प्रवर्गांचा समावेश होता. या बदलांमुळे एएससीआयची आचारसंहिता उद्योगक्षेत्राचे बदलते आयाम व ग्राहकांच्या अपेक्षा यांच्या पार्श्वभूमीवर सुसंबद्ध राहते.
एएससीआयच्या कठोर तक्रार निवारण व देखरेख कामांचा भाग म्हणून या वर्षभरात १०,००० हून अधिक तक्रारींवर प्रक्रिया करण्यात आली आणि ८,२०० जाहिरातींचे परीक्षण करण्यात आले, यातून जाहिरात उद्योगाचा दक्ष संरक्षक ही संस्थेची भूमिका अधोरेखित होते.
जाहिराती अधिकाधिक नैतिक, समावेशक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने काम करण्यास एएससीआय समर्पि
त आहे.


