Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorized60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन...

60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना* *धार्मिक क्षेत्रातील संस्था व व्यक्तींनी त्वरीत संपर्क साधावा*

 

 

*ठाणे, दि.11(जिमाका) :-* देशात सर्वधर्मियांची लोकप्रिय विविध तीर्थस्थळे आहेत. जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जावून मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वधर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय क्र. ज्येष्ठना-2024/ प्र.क्र.189/ सामासु, दि.14 जुलै 2024 नुसार राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. बाबींचा समावेश असेल. भारतातील 73 व राज्यातील 66 निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. या योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येणार आहे.

अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, अधिवासबाबत पुरावा, उत्पन्न दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी पालन करण्याबाबत हमीपत्र इ. कागदपत्रे आवश्यक राहतील.योजनेचे अर्ज स्वीकारण्याकरिता शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

तत्पूर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता आपल्या स्तरावर करावी व ऑफलाईन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, 4 था मजला, सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, ठाणे – 400605 येथे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी त्वरित सामाजिक न्याय विभागाशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.

000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments