पुणे,12 सप्टेंबर 2024 : पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या व्हीटीपी रिअल्टी ने दुबई,युएई येथे नवीन कॉर्पोरेट ऑफिस सुरू केले आहे. याचबरोबर ब्रँडने आपला पहिला मोठा जागतिक विस्तार केला असून जागतिक स्तरावर पुण्यातील रिअल इस्टेट जीसीसी (गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल) बाजारपेठेत एनआरआय ग्राहकांसाठी घेऊन आले आहे.
पुरस्कार प्राप्त ब्रँड असलेल्या व्हीटीपी रिअल्टीने आपल्या अनोख्या व अद्वितीय रिअल इस्टेट प्रकल्पांसह पुण्यात लोकप्रियतेचे स्थान मिळवले असून हा ब्रँड जागतिक ग्राहक वर्गाला देखील आकर्षित करत आहे.19000 पेक्षा अधिक ग्राहकांसह व्हीटीपीकडे जगभरातील एनआरआय ग्राहकांची संख्या देखील लक्षणीय आहे. दुबईमध्ये आपली उपस्थिती प्रस्थापित करण्याचा निर्णय कंपनीच्या जीसीसी देशांमध्ये आपला विस्तार वाढवण्याकरिता आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याची वचनबध्दता प्रतिबिंबित करते.
व्हीटीपी रिअल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले की, व्हीटीपी रिअल्टीचा अभिनवता आणि गुणवत्तेचा वारसा जीसीसी बाजारपेठेत घेऊन जाताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा महत्त्वाचा टप्पा आमच्या व्यवसाय विस्तारीकरणाचा फक्त भाग नसून पुण्यातील सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट उत्पादने जगासमोर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. दुबईमधील आमचे नवीन कार्यालय रिअल इस्टेटमध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या आमच्या प्रवासामधील एक लक्षणीय पाऊल आहे आणि सर्जनशीलपणे डिझाईन केलेली राहण्याची ठिकाणे,एनआरआय ग्राहकांपर्यंत घेऊन येणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. दुबईमधील आमच्या टीमच्या उपस्थितीमुळे सर्व जीसीसी ग्राहकांना थेट सेवा उपलब्ध होणार असून यामुळे त्यांना पुण्यात घर खरेदी करण्याबाबत योग्य आणि जलद निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
दुबईतील नवीन ऑफिससह व्हीटीपी रिअल्टीचे उद्दिष्ट जीसीसी क्षेत्रातील वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग व एनआरआय ग्राहकांना अद्वितीय गुंतवणूक संधी देण्याचे आहे. ब्रँडचे प्रकल्प बांधकामाच्या पलिकडे जाऊन गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांसह समृध्द,अद्वितीय व चांगल्या जीवनशैलीचा अनुभव प्रदान करतात.
व्हीटीपी रिअल्टीचा विस्तार फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील घर मालकांच्या आकांक्षांशी जुळतील अशी घरे विकसित करण्याच्या ब्रँडच्या उद्दिष्टाचा पुरावा दर्शविते. एनआरआय ग्राहकवर्गाला आपली जागतिक जीवनशैली व राहणीमानाला साजेसे घर खरेदी करण्याची इच्छा असते,त्यामुळे पुण्यासह भारतात आलिशान आणि उच्च श्रेणीतील घरांना लक्षणीय मागणी आहे. परदेशात त्यांनी अनुभवलेल्या व निरीक्षण केलेल्या जीवनशैलीशी जुळण्यासाठी व्हीटीपी रिअल्टीने पुण्यात प्रमुख ठिकाणांचा अधिकधिक उपयोग करून आलिशान घरे आणि व्हिला तयार केले आहेत,जे गुंतवणूकीवर उत्कृष्ट परतावा आणि वाढ मिळवून देतात.
दुसऱ्या देशातून घर खरेदी करणे ही बाब नेहमीच आव्हानात्मक असते,म्हणूनच व्हीटीपी ने सर्व जागतिक ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सोपी केली आहे. सर्व एनआरआय भारतीयांना त्यांच्या सोयीसाठी सुलभ पेमेंट योजना,कन्स्ट्रक्शन-लिंक्ड पेमेंट प्लॅन आणि विशेष व्याजमुक्त प्लॅन प्रदान करणारे व्हीटीपी हे एकमेव डेव्हलपर आहे.
केवळ व्हीटीपी ग्राहकांसाठी एक फायदेशीर बाब म्हणजे बुक केलेल्या युनिटसचे ई-रेजिस्ट्रेशन करता येणार आहे. भारतात प्रवास न करता देखील आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी करता येणार आहे. ग्राहकांना आपल्या नवीन मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी भारतापर्यंत प्रवास करण्याची आवश्यकता नाही. व्हीटीपीच्या विशेष ऑनलाईन ई- रेजिस्ट्रेशनमुळे जगात कुठूनही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
आखाती देशांमधील भारतीयांना व्हीटीपी रिअल्टी या प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रि
त करत आहे.


