Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे १७ व्या टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्ट २०२४...

टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे १७ व्या टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्ट २०२४ ची घोषणा

पुणे, १० जानेवारी २०२४ : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) तर्फे वर्ष 2024 करिता 17 व्या टोयोटा ड्रीम कार आर्ट कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत प्रवेशांसाठी खुली असेल. “युअर ड्रीम कार” या संकल्पनेसह, देशभरातील मुलांना त्यांच्या ड्रीम कारचे चित्र आणि स्केच बनवून त्यांची सर्जनशीलता दाखवता येणार आहे. तरुण शोधक, विचारवंत आणि स्वप्न पाहणाऱ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. 15 वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या या स्पर्धेमध्ये तीन वयोगट श्रेणी आहेत: श्रेणी 1 (7 वर्षांपर्यंत), श्रेणी 2 (8-11 वर्षे वयोगट), आणि श्रेणी 3 (12-15 वर्षे वयोगटातील).ही स्पर्धा राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर असणार आहे. “राष्ट्रीय स्पर्धा” जानेवारी 2024 पासून होणार आहे, ज्यामध्ये नऊ विजेत्यांना (प्रत्येक श्रेणीतील तीन) जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची आणि शैक्षणिक अनुदान मिळवण्याची संधी मिळणार आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments