गुरूग्राम, भारत – सप्टेंबर १७, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज आपल्या आगामी फ्लॅगशिप गॅलॅक्सी टॅब्लेट्ससाठी प्री-रिझर्व्हच्या शुभारंभाची घोषणा केली.
ग्राहक अर्ली अॅक्सेस फायद्यांचा आनंद घेण्यासाठी आजपासून Samsung.com, सॅमसंग इंडिया स्मार्ट कॅफे, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्ससह Amazon.in व Flipkart.com वर आणि भारतभरातील सॅमसंगच्या अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये आगामी फ्लॅगशिप टॅब्लेट्स प्री-रिझर्व्ह करू शकतात.
ग्राहक १,००० रूपयांची टोकन रक्कम भरत नवीन डिवाईसेस प्री-रिझर्व्ह करू शकतात. आगामी फ्लॅगशिप गॅलॅक्सी टॅब्लेट्स प्री-रिझर्व्ह करणाऱ्या ग्राहकांना ३४९९ रूपयांचे फायदे मिळतील.
सॅमसंगच्या फ्लॅगशिप टॅब्लेट्समध्ये उल्लेखनीय नाविन्यतांसह इंटेलिजण्ट परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, सुधारित क्रिएटिव्ह टूल्स आणि अनुकूल वैशिष्ट्ये आहेत, जे उत्पादकता व सर्जनशीलतेला नव्या उंचीवर घेऊन जातात.
आगामी फ्लॅगशिप गॅलॅक्सी टॅब्लेट्स नवीन वैशिष्ट्ये सादर करत आणि मल्टी-टास्कर्ससाठी या वैशिष्ट्यांना परिपूर्ण उत्पादकता सोबती बनवत सॅमसंगच्या उल्लेखनीय इनोव्हेशन्सच्या संपन्न वारसाला अधिक दृढ कर
तील.


