*नाशिक जिल्हा बँक आर्थिक डबघाईला आणून ती बंद पाडणे किंवा बुडवण्याच्या कारवाईमध्ये शेतकऱ्याचा कुठेही संबंध नाही, बँक बुडाली म्हणून शेतीचे आर्थिक पतधोरण ठप्प झाल्याने शेती पीक निघाले नाही त्यामुळे कर्ज परतफेड करता आली नाही यामध्ये सर्वात दोषी बँक डीडीआर सहकार विभाग यांची जबाबदारी निश्चित आहे तसेच नाशिक जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ तत्कालीन पालकमंत्री लोकप्रतिनिधी बँकेची संबंधित किंवा बँकेवर सर्वे सर्व म्हणून ताबा गाजवणाऱ्या, ज्यां संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी बँक बुडवली त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही, ज्यांचेवर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78/79 कलम 88 नुसार वसुली निश्चित झालेली आहे त्यांचे 180 कोटी वसूल करा, बेकायदेशीर वाटप केलेले बिगर शेती, भुजबळ उद्योग कर्ज वसूल करा, तसेच राज्य सरकारने नाशिक डीसीसी बँकेला 700 ते 800 कोटी रुपयांची थक हमी द्यावी बाबत संघटनेचा पत्रव्यवहार सुरू आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समन्वय विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, बँकेचे प्रशासक संचालक अधिकारी यांचे सोबत सह डी डी आर उपनिबंधक जिल्हाधिकारी राज्याचे सहकार आयुक्त व अतिरिक्त मुख्य सचिव अर्थ महाराष्ट्र राज्य आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत संघटनेचे सातत्याने पत्रव्यवहार बोलणे सुरू आहे त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व अर्थमंत्री यांना देखील पत्र व्यवहार केलेला असून देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व आरबीआयचे गव्हर्नर यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केलेला आहे अशी माहिती देखील विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.*
*नुकतीच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा बँकेने अनेक दैनिकांच्या वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या शेत जमिनीचा लिलाव जप्ती नोटीसाच्या संदर्भात बँक कोणतीही कारवाई करणार नाही असा दृड विश्वास आहे, कदाचित बँकेने तो गमवला तर बँकेला पुढच्या प्रवासाला सामोरे जावे लागेल असा मनोमन विश्वास आहे.!*
*शेतकरी भावांनो, मातांनो तशी चिंता करण्याची बिलकुल आवश्यकता नाही, मी तुमच्या बंधू,रक्षक, सर्वांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सरकार, सहकार आयुक्त नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर विभागीय आयुक्त डी डी आर उपनिबंधक व बँकेचे प्रशासक यांच्याशी माझा सुसंवाद, पत्रव्यवहार व भ्रमणध्वनीवरून संपर्क चर्चा सुरू आहे, तुमच्या माहितीसाठी चिंतेचं कोणतही कारण नाही.*
*यदा कदाचित जरी बँकेने शासन प्रशासन किंवा राज्य सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा छळवाद करत शक्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीला जप्तीचा किंवा निलावाचा हात लावण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना त्यांची सजा कायदेशीर मार्गाने देऊ इतका विश्वास आहे., माझे श्री लक्ष्मण बोगीर, श्री नाना बच्छाव, त्यासोबतच संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष अण्णासाहेब खैरनार, नाशिक जिल्हा कायदेशीर आघाडीचे अध्यक्ष रोहन कोर पाटील, नाशिक विभागाचे अध्यक्ष एडवोकेट विलास मोरे संघटनेचे प्रदेश सचिव डॉक्टर गजेंद्र पाटील नाशिक विभागाच्या महिला अध्यक्षा डॉक्टर ममता काबरा यांच्यासोबत सातत्याने बोलणं होत आहे, त्यांच्या माध्यमातून मी हा निरोप तुम्हाला पाठवत आहे, तुम्ही ही एक बातमी छोटासा मेसेज तयार करून सर्वांना पाठवा, मी नाशिक जिल्ह्यातील जितक्या संघटना ग्रुप व शेतकऱ्यांचे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मी त्यांना हा मेसेज संघटनेच्या व्हाट्सअप किंवा ई-मेलवरून पाठवतो आहे, तसेच नाशिक जिल्ह्यातील माझ्या शेतकरी भावांनो मातांनो कष्टकरी शेतकऱ्यांनो जमीन लिलाव अथवा जप्तीच्या संदर्भात आलेल्या नोटिसांमुळे तुम्ही कोणीही कसल्याही प्रकारे घाबरून जाण्याचा कारण नाही, ज्यांच्या जमिनी बँकेने जप्त करून त्या ठिकाणी बँकेचे नाव किंवा सोसायटीचे नाव लावलेला आहे त्या जमिनीत सुद्धा तुम्हाला 1001% परत मिळतील नवे त्या परत घेऊन, मी संघटनेचा अध्यक्ष व तुमच्या सर्वांचा सेवक आणि शरद जोशींचा पाईक त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन देशभरतील 31 राज्यात कार्यरत असलेल्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य आणि संघटनेचा पाईक म्हणून, विठ्ठल राजे पवार नाशिक जिल्ह्याचं देशभरातील सर्व शेतकरी कष्टकरी कामगार व नाशिक जिल्ह्यातील तुम्हा माय माऊली शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, मी कोणत्याही निवडणूक अथवा मतासाठी लाचार नसून किंवा जातीसाठी भांडत नसून *”केवळ शेतकरी ही माझी जात आणि विश्वास आहे,,* *तो शेतकरी आदिवासी असेल किंवा अठरापगड जातीतला शेतकरी असेल तो माझा भाऊ आहे, माझ्या शरीराचा व रक्ताचा एक थेंब अविभाज्य घटक आहे, माझ्या शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ, संघटनेचा तो सदस्य पाईक आहे, माझ्या राज्याचा आणि राष्ट्राचा तो पोशिंद, अन्नदाता आहे याची जाणीव राज्याने केंद्र सरकारला देखील आहे, म्हणून त्याच्या केसालाही धक्का लागू नये याची जबाबदारी जितकी माझी आहे तितकी राज्याने राष्ट्राची देखील आहे, मी माझ्या न्यायपालिकेच्या कायद्यावर विश्वास ठेवत माझ्या परीने माझ्या अवकातीनुसार सत्यमेव जयते निर्णय घेत आहे, तुम्हाला विनंती आहे तुमच्या आजूबाजूच्या सुदृ जे सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या घाबरलेल्या थकलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना धीर द्यावा त्यांचे मनोबल वाढवावे किंवा आमच्याशी तत्काळ संपर्क करून द्यावा,आणि तुम्हालाही विश्वास देतो की तुमच्या शेती, तुम्हांला जरी कुणी, शक्तीने छळ किंवा तुमच्या कुटुंबाला धक्का, मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला संघटना कायदेशीर मार्गाचा अवलंब करत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार व गैरप्रकाराबाबत अत्यंत कठोर शासन करण्यासाठी न्यायिक मार्ग अवलंबवेल, शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका तुमची जमीन जप्ती व लिलावाच्या संदर्भातील आकाशा पोटी सक्तीने बळजबरीने व शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मानसिक छळ व धक्का पोहोचेल अशी नाशिक जिल्हा बँकेत च्या सक्ती करणारा ला कायदेशीर मार्गाचा वापर करत सोडणार नाही हा विठ्ठल राजे पवार यांचा दावा वचन आहे, आमच्या जीवात जीव असेपर्यंत शरद जोशींचा आशीर्वाद, विचार आमच्या डोक्यामध्ये सदसद विवेक बुद्धीने शाबूत आहेत, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज व शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराचा पगडा, सोबत न्यायदानाची आणि शरद जोशींचे विचारांची शिदोरी आमच्या डोक्यात विचारात आहेत तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे यापुढे कोणतीही आर्थिक शोषण क्षण नुकसान होऊ देणार नाही आणि शेतकऱ्याला कुणीही धक्का पोहचवेल अशी गैर कृती करणार नाही हे आमचं वचन आहे आणि संघटनेचे तुम्हा सर्वांना पाठबळ आहे, फक्त तुम्ही कुठल्याही राजकीय भ्रष्टाचारात बरबटलेल्या अर्बन नक्षल्यांच्या विष्याच्या वृक्षवल्लीचे सावली सोबत भुलून जाऊ नये. त्यांचा ऐकू नये,.*
*पुन्हा एकदा सांगतो शरद जोशींचे विचार, शेतकरी संघटनेचे विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, राज्यातले ३५३ तालुके, ३६ जिल्हे, २८००३ ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकरी सभासद व ३७६३ शाखांचे अध्यक्ष ८३०००. सभासद, मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाच्या आदेशामुळे विज बिल मुक्त झालेले सव्वादोन कोटी शेतकऱ्यांपैकी शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघ, संघटनेचे ऑनलाईन सभासद झालेले ३९ लाख शेतकरी कष्टकरी कामगार सभासद पदाधिकारी हे सर्व तुमच्या नाशिक जिल्ह्यातील घावरलेल्या शेतकऱ्यां सोबत आहेत, काळजी करू नये, ही विनंती.*
*धन्यवाद.*
*तुमचा स्नेहांकित किसान सेवक.*
*विठ्ठल राजे पवार.*
*भ्रमणध्वनी क्रमांक 8805401314*
*ईमेल एड्रेस, nvithal.fams@gmail.com*


