पुणे, ७ ऑक्टोबर २०२४ : निकॉन कॉर्पोरेशनची संपूर्ण उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि. तर्फे दुर्गा पूजा निमित्त आमार पुजो विथ निकॉन ही मोहीम सादर केली आहे. १३ ऑक्टोबर पर्यंत सुरु असणाऱ्या या मोहिमेमध्ये माय निकॉन ऍप वर आपल्या निकॉन कॅमेरा किंवा लेन्स साठी नोंदणी करून विशेष ऑफर्स मिळणार आहेत. त्याच बरोबर १ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर दरम्यान मिररलेस झेड सिरीज कॅमेरा किंवा लेन्स माय निकॉन ऍपवर खरेदी केल्यास ६ महिन्याची अतिरिक्त सर्व्हिस वॉरंटी मिळेल.


