Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात*

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात*

पुणे, दि. ७: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवशीय प्रशिक्षणास आजपासून सुरुवात झाली.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि सिम्बायोसिस येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत या प्रशिक्षणासाठी समन्वय करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणांतर्गत यशदा येथे राज्यातील १३७ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ६४ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तर सिम्बायोसिस येथे प्रत्येकी ४ जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, ६८ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ११ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर यांनी दिली.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments