Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्ल्ड आर्थरायटिस डे 2024 निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

वर्ल्ड आर्थरायटिस डे 2024 निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे,11 ऑक्टोबर 2024 : संधिवात असलेल्या रूग्णांसाठी कार्यरत मिशन आर्थरायटिस इंडिया (माई) आणि सेंटर फॉर ऱ्हयुमॅटिक डिसीज (सीआरडी) यांच्या तर्फे वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त रविवारी,13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ९.३० वाजता पूना क्लब येथे माईंड अँड आर्थरायटिस या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ.प्राची साठे उपस्थित राहणार असून मानसोपचारतज्ञ डा.मंजिरी दीक्षित,फिजिरोथेरपीस्ट डॉ.अपर्णा साधळे आणि संधिवात तज्ञ डॉ.अरविंद चोप्रा आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती माई च्या अध्यक्षा श्रीमती दीपा मेहता यांनी दिली.

संधिवात आणि संबंधित समस्यांच्या विविध पैलूंबद्दल शास्त्रीय माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करून जागरूकता निर्माण करणे हे माई चे उद्दिष्ट आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – 9405868875/8999232351

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments