Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय प्रेक्षकांनी मला खुल्या दिलाने स्वीकारले त्यामुळे भारतात खेळणे माझ्यासाठी विशेष आनंददायी...

भारतीय प्रेक्षकांनी मला खुल्या दिलाने स्वीकारले त्यामुळे भारतात खेळणे माझ्यासाठी विशेष आनंददायी – रचीन रवींद्र करोडो भारतीयांच्या अपेक्षा खांद्यावर घेवून सर्वोच्च कामगिरी करणारा सचिन आहे रचीनचा आवडता खेळाडू

पुणे, ऑक्टोबर २३ : भारतीय प्रेक्षकांनी मला खुल्या दिलाने स्वीकारले. त्यामुळे भारतात खेळणे माझ्यासाठी विशेष आनंददायी असते असे मत सध्या भारत दौरा करत असलेल्या न्यूझीलंड कसोटी संघाचा सदस्य व गुणवान क्रिकेटपटू रचीन रवींद्र याने व्यक्त केले.

रोहन पाटे यांनी पुण्यात सहकार नगर येथे स्थापन केलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाला रचीन याने काल सदिच्छा भेट दिली. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना रचीनने विविध गोष्टींवर भाष्य केले. यावेळी न्यूझीलंड कसोटी संघातील टीम सौदी, मार्क चँपमन व टॉम बुन्डेल हे खेळाडू देखील उपस्थित होते. जगात क्रिकेट वस्तूंचा सर्वात मोठा संग्रह असलेल्या या क्रिकेट संग्रहालयाची माहिती यावेळी संस्थापक रोहन पाटे यांनी खेळाडूंना दिली.

चांगली मैदाने, खेळपट्ट्या व उत्तम प्रशिक्षण सुविधा या क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वाच्या असतात. परंतु अशा प्रकारचे क्रिकेट संग्रहालय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल व त्यामुळे क्रिकेटच्या विकासाला नक्की हातभार लागेल असे रचीन म्हणाला. फलंदाजीला जाताना १०० कोटींपेक्षा जास्त लोकांच्या अपेक्षा खांद्यावर घेवून कायम उत्कृष्ट कामगिरी करणारा सचिन तेंडूलकर माझा आदर्श खेळाडू असल्याने संग्रहालयातील त्याच्या वस्तू पाहून आपल्याला अतिशय आनंद झाल्याची भावना रचीनने यावेळी व्यक्त केली. संग्रहालयातील सचिनने वापरलेली एखादी वस्तू आपल्याला मिळावी अशी इच्छा रचीनने व्यक्त केल्यावर रोहन पाटे यांनी त्याला सचिन तेंडूलकरने कसोटी सामन्यात परिधान केलेला टी शर्ट रचीनला भेट दिला. यावेळी माझ्या आईने तयार केलेला दोसा हा माझा सर्वात आवडीचा भारतीय खाद्य पदार्थ असल्याचे देखील रचीनने सांगितले.

यावेळी टीम सौदी या खेळाडूने संग्रहालयात कसोटी क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त खेळाडू बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष विभागात आपला स्वाक्षरी असलेला चेंडू ठेवला आणि लवकरच आपण ४०० पेक्षा जास्त खेळाडू बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या विभागात चेंडू ठेवायला येवू असा विश्वास व्यक्त केला. टीम सौदी या खेळाडूने याआधी १० वर्षांपूर्वी ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली होती. संग्रहालयाचे त्यानंतर झालेले विस्तारीकरण व संग्रहात झालेली लक्षणीय वाढ यांचे त्याने आवर्जून कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments