महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वार्षिक परिषदेला नुकतेच सोलापूरमध्ये यशस्वीरीत्या पार पडले, ज्यामध्ये ३,००० पेक्षा अधिक नेत्रतज्ज्ञ सहभागी झाले.
या परिषदेमध्ये पुण्यातील रेटिना सर्जन डॉ. पियुष बन्सल यांची महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या (MOS) शास्त्रीय समितीचे अध्यक्ष या प्रतिष्ठित पदावर निवड झाली. या भूमिकेत, डॉ. बन्सल पुढील दोन वर्षांसाठी सर्व शास्त्रीय, शैक्षणिक, संशोधन कार्यक्रम तसेच जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व करतील.
MOS ही भारतातील सर्वात मोठी राज्य नेत्रतज्ज्ञ संघटना आहे आणि महाराष्ट्रात नेत्रचिकित्सा सेवांचा आणि शिक्षणाचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


