Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंबेगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदान जनजागृती; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदान जनजागृती; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*
पुणे, दि.२५ :विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध भागात पथनाट्य तसेच रॅलीद्वारे मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मताधिकार बजावण्याचा संकल्प मतदार करीत आहेत.
२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, याकरिता मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील विविध भागात मतदार जनजागृती रॅली तसेच पथनाट्याचे कार्यक्रम राबविले जात आहे.

*शिरूरमधील ढोरसांगवी आणि कान्हुर मेसाई गावात विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती*
“मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणा देत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी ढोरसांगवी आणि कान्हुर मेसाई गावातून मतदान जागृती फेरी काढली. शिवाय ढोरसांगवी गावात ७७६ तसेच कान्हुर मेसाई गावात ११६ विद्यार्थ्यांना संकल्पपत्रांचे वाटप करण्यात आले असून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरातील मतदारांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

*५० टक्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या गावांना भेटी देऊन मतदार जनजागृती*
आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गतनिवडणुकीत ज्या भागात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले अशा भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा भागात आणि गावात अधिक प्रमाणात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. अशा गावातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी कर्मचारी, ग्राहक तसेच सभासदांकडून यावेळी मतदान संकल्प पत्रे भरुन घेण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक हा सशक्त व सक्षम लोकशाहीचा उत्सव असून शंभर टक्के प्रत्यक्ष मतदान करून तो सर्वांनी साजरा करायला हवा, असा संदेश देत मतदारांना यावेळी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करून मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments