Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न*

*

पुणे, दि. २७: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात व‍िधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त १ हजार २४० अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुणे जिल्हयातील अवसरी येथील शांता शेळके सभागृहात प्रशिक्षण संपन्न झाले.

या प्रशिक्षणात आंबेगाव मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक व प्रमिला वाळुंज यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ सचिन वाघ तसेच निवडणूक कक्षाचे विविध समन्वयक उपस्थित होते.

या प्रशिक्षणात श्री. नागटिळक यांनी मॉक पोल, मतदान केंद्रावरील नियमावली, निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदी, महत्वाचे अधिनियम, विधानसभा निवडणूक २०२४ मधील महत्वाचे बदल याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मतदानादरम्यान विविध नमूने कसे भरावयाचे याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती वाळुंज यांनी देखील विविध बाबींची माहिती दिली.
निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. क्षेत्रिय अधिकारी, तलाठी आणि मास्टर ट्रेनर यांनी हे प्रशिक्षण दिले.

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments