पुणे, मुंबई २८ ऑक्टोबर २०२४: सध्या भारतीयांमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या ब्रँड्सच्या उत्पादनांची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी लोकांमध्ये वाढता उत्साह लक्षात घेत, एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (एम्क्युअर) या प्रसिद्ध फार्मा कंपनीने आता या बाजारपेठेत येण्यासाठी एक पाऊल पुढे उचलले आहे. एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडने आता एम्क्युटिक्स बायोफार्माक्युटिकल्स लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना केली असल्याचे जाहीर केले. या नव्या कंपनीअंतर्गतच मूळ कंपनीच्या त्वचेसंबंधी (डर्मेटॉलॉजी) व्यवसायाचा भाग जोडला जाईल. व्यवसायाच्या वृद्धीसाठी नव्या कंपनीत नवी टीम उभारली जाईल. ही टीम केवळ नव्या व्यवसायवृद्धीसाठी लक्ष केंद्रित करेल. सध्याच्या भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी लक्षात घेत, नवनव्या उत्पादनांची निर्मिती, तसेच डिझाइन्स तयार करण्यासाठी, तसेच सर्वसमावेशक योजना तयार करण्यासाठी ही टीम तत्परेने कार्यरत राहील.
त्वचेची निगा राखणारी उत्पादने खरेदी करण्याकडे अनेक लोकांची पसंती दिसून आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आय.क्यू.व्ही.आय.ए.मधील अहवालानुसार, देशात त्वचेसाठीच्या उत्पादनांतील खरेदी व्यवसायात जुलै महिन्यात १.८४ बिलीयन डॉलरइतपत उलाढाल झाली. आजारांवरील उपचारांसाठी, तसेच सौंदर्यवर्धनासाठी आवश्यक उत्पादने या दोन्हींबाबत भारतातील ग्राहकांमध्ये सजगता दिसून आल्याचेही निदर्शनास आले.
या व्यवसाची वाढती मागणी लक्षात घेत, एम्क्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (एम्क्युअर) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले की, ‘’डर्मेट़ॉलॉजी क्षेत्रात उत्पादनांची संख्या आणि किमती यांत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. बाजारातील मागण्या लक्षात घेत,एम्क्युअरकडून सर्वोत्तम दर्जाची उत्पादने पुरविली जातील. डॉक्टरांच्या, तसेच ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेत, दर्जेदार उत्पादनांची निर्मिती केली जाईल.‘’
गल्डॅर्मा या प्रसिद्ध फार्मा कंपनीचे दक्षिण आशियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. सत्य नारायणन एम्क्युटिक्स कंपनीची धुरा सांभाळतील. गल्डॅर्मा कंपनीचा कारभार सांभाळताना कंपनीचे भारतातील व्यवस्थापनही जी. सत्य नारायणन यांनीच पाहिले होते. त्यांनी त्वचासंवर्धन या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित (डर्मेटॉलॉजी) व्यवसायात तीस वर्षे अविहरतपणे आपले योगदान दिले आहे. ग्राहकांची मागणी, तयार होणारी उत्पादने, तसेच डॉक्टरांकडून सुचविली जाणारी आणि ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती वाढविणे यात त्यांचा हातखंडा मानला जातो.
कंपनीतील पदभार स्विकारल्यानंतर जी. सत्य नारायणन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘’आरोग्यसेवेशी निगडित तज्ज्ञ, त्वचेच्या असंख्य आजारांचा सामना करणारे रुग्ण, त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्पादने खरेदी करणारे ग्राहक या सर्वांचा समूळ विचार करत, आम्ही उत्तम दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करु. या नव्या कंपनीतून एम्क्युअरची यशस्वी घौडदौड अविरहितपणे सुरु राहील. देशातील वाढती डर्मोटॉलॉजी क्षेत्रातील मागणी लक्षात घेत नावीन्यपूर्ण उत्पादने लाँच करण्यावर माझा भर राहील. ‘’


