*
पुणे, दि.२९ : पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक पदी भीम सिंग यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी दिली.
निवडणूक निरीक्षक श्री. भीम सिंग यांचा निवासाचा पत्ता ए- ३०५ व्हीव्हीआयपी-१ सर्किट हाऊस, (ग्रीन बील्डींग)२४, क्वीन्स् गार्डन, कॅम्प, पुणे असा आहे. संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२२६५७३६४६ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांचा संपर्क क्रमांक ९७६५९४११६६ असा आहे. निवडणूक निरीक्षक भीम सिंग यांना व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे भेटण्याची वेळ सोमवार, बुधवार व शुक्रवार रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. श्री. सिंग यांनी मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयास भेट देऊन नामनिर्देशन स्विकारण्याच्या ठिकाणाची व कामकाजाची पाहणी केली.
000


