*
*ठाणे,दि.31(जिमाका):-* महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 150-ऐरोली व 151-बेलापूर या मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.त्रिलोचन माझी (भा.प्र.से.) हे सोमवार, दि.28 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत.
श्री.त्रिलोचन माझी (भा.प्र.से.) हे एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सीवूड्स इस्टेट, बिल्डिंग नंबर 38/1201 गेस्ट हाऊस, नेरुळ, नवी मुंबई येथे सकाळी 9 ते 10 या वेळेत नागरिकांना भेटण्याकरिता उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ७०३९०८०८९१ तर ईमेल आयडी generalobserver150151@gmail.com हा आहे.
00000


